अंबाजोगाईत उपविभागीय कार्यालयावर धडकला रिपाइंचा लक्षवेधी आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:41 PM2021-02-09T16:41:38+5:302021-02-09T16:44:03+5:30

गरीब व दलितांचे प्रश्न राज्य सरकारकडून  तात्काळ  सोडवून घेण्यायासाठी  प्रत्येक तालुक्यात रिपाइं मोर्चा काढणार आहे.

RPI's eye-catching protest on the sub-divisional office in Ambajogai | अंबाजोगाईत उपविभागीय कार्यालयावर धडकला रिपाइंचा लक्षवेधी आक्रोश मोर्चा

अंबाजोगाईत उपविभागीय कार्यालयावर धडकला रिपाइंचा लक्षवेधी आक्रोश मोर्चा

Next

अंबाजोगाई : राज्य सरकारकडून गरीब व दलितांवर अन्याय केला जातो आहे. त्यांच्या अडीअडचणींचे या सरकारला देणेघेणे नाही. गायराण जमिनी व भोगवट्यातील घरे अद्यापही नावची केली जात नाहीत. महामंडळांना निधी न दिल्याने महामंडळे डबघाईला आली आहेत. अन्याय अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे गरीब व दलितांचे प्रश्न राज्य सरकारकडून  तात्काळ  सोडवून घेण्यायासाठी  प्रत्येक तालुक्यात रिपाइं मोर्चा काढणार आहे. असल्याचा इशारा युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिला आहे.

येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्या घेवून मंगळवार (ता.9) आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या आक्रोष मोर्चात हजारो आंबेडकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात पप्पू कागदे यांनी म्हंटल आहे की,  बर्दापूर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तोडफोड व विटंबना होऊन 4 महिन्यांचा काळ लोटला आहे. त्याठिकाणी  अद्यापपर्यंत शासनाने नविन पुतळा बसवून स्मारकाचे बांधकाम सुरू केलेले नाही. त्यामुळे तात्काळ पुतळा बसवून बांधकाम सुरू करण्यात आले पाहिजे. पुतळा विटंबना प्रकरणातील सहआरोपी व सूत्रधार यांचा शोध घेऊन तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा. गायरान धारकांचे सरसकट 7/12 नांवे नोंद करून सातबारा द्या, दलित वस्ती विकास योजना वाढीव व प्रभाविपणे राबवण्यात यावी. लॉकडाऊन काळातील विद्युत वीज बील माफ करण्यात यावे. शहरी व ग्रामीण भागातील रहिवासी राहते भोगवट्यातील जागेत मालकी हक्क नांवे नोंद करून पीटीआर व 7/12 द्या, यासह  विविध मागण्यााठी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केल्या आहेत.

सरकारने राज्यातील गायराण जमीनी पोट खराब कायद्यात टाकल्यामुळे गायराण धारकांना बँक कर्ज मिळत नाही. त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा. राज्यातील अण्णाभाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ आदी  मागासवर्गीय  महामंडळांना गेल्या एक वर्षांपासून निधी दिला नाही. तो निधी तात्काळ देण्यात यावा, अशी मागणी या मोर्चात युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केली आहे.

यावेळी  राजू जोगदंड, किसन तांगडे, दशरथ सोनवणे,प्रमोद दासुद, दिपक  कांबळे,अशोक साळवे,मजर खान, दीपक कांबळे, गोवर्धन वाघमारे, महादेव उजगरे, बापू पवार, नरेंद्र जावळे, सचिन कागदे,बन्सी जोगदंड,राणी गायकवाड,कपिल कागदे,मंगेश जोगदंड, राहुल गंडले,किरण खंडागळे,सनी वाघचौरे,प्रकाश तांगडे, यांच्यासह हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

Web Title: RPI's eye-catching protest on the sub-divisional office in Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.