शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

केज शिवसेना तालुकाप्रमुखांच्या घरी धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 17:19 IST

 केजचे शिवसेना तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या अयोध्या नगर मधील घरी धाडसी चोरी झाली.

केज (बीड ) :  केजचे शिवसेना तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या अयोध्या नगर मधील घरी धाडसी चोरी झाली. आवाजाने त्यांची पत्नी उठली आणि चोरट्यांना प्रतिकार केला. याचवेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील गंठन हिसकावून घेत पळ काढला. हा प्रकार रविवारी रात्री घडला.  या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

केज येथील शिवसेना तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या घरी दिपावलीनिमित्त नातेवाईक आले होते. त्यातच रत्नाकर शिंदे हे बाहेरगावी गेल्याची संधी साधुन त्यांच्या अयोध्या नगरातील घराच्या खिडकीची लोखंडी जाळी काढुन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्या ठिकाणी त्यांची पत्नी व मुलगा झोपलेले होते. घरात शिरकाव केलेल्या चोरट्याने हातातील बॅटरी लावत घरातील सामानाचा अंदाज घेतला. यावेळी बॅटरीचा प्रकाश  मंजुषा शिंदे यांच्या डोळ्यावर चमकल्याने त्यांना जाग आली. त्यांनी घरातील कोणी असेल म्हणून कोण आहे, अशी विचारणा केली.

याचवेळी चोरट्यांनी त्यांना गप्प बस, असा दम दिल्याने त्यांनी बेडवरून उठण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. मंजुषा शिंदे यांनी सर्व ताकद एकवटून चोरट्यास ढकलून दिल्याने चोरटा खाली पडला. त्याच वेळी शिंदे यांनी घराचे दार उघडून घरच्यांना आवाज दिला असता एका चोरट्याने धक्का देत त्यांच्या गळ्यातील गंठन हिसकावून घेत पळ काढला. 

घटनेची माहिती समजताच पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी सर्व तपासणी केली मात्र हाती काहीच लागले नाही. याप्रकरणी मंजुष शिंदे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार डोंगरे हे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिसBeedबीड