शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; महिलांकडील दागिने हिसकावून चोरटे पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 12:24 IST

गंगाखेड -परळी दरम्यान रेल्वे क्रॉसिंग झाल्यानंतर चोरट्यांचा धुमाकूळ 

- संजय खाकरे परळी ( बीड ) : शिर्डी-सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये पहाटे 1.16 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घातला. परळी- परभणी मार्गावरील वडगाव येथे रेल्वे क्रॉसिंगच्या दरम्यान गाडी थांबली असता खिडकीतून हात घालत आतील पाच प्रवाशी महिलांच्या गळ्यातील दहा तोळे सोने हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला.

गंगाखेड रेल्वे मार्गावर असलेल्या वडगाव निळा येथील रेल्वेची क्रॉसिंग असल्याने शिर्डी -सिकंदराबाद रेल्वे काही मिनिटे थांबली होती. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी खिडकीतून आत हात घालत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून घेतले, अशी माहिती औरंगाबादहून उदगीरकडे प्रवास करणाऱ्या श्रीनिवास सोनी यांनी दिली. 

कमलनगर जिल्हा बिदर येथील एका महिलेच्या गळ्यातील पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र शिर्डी - सिकंदराबाद रेल्वे गाडीतून चोरीस गेले आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीने उदगीर येथील रेल्वे पोलीस चौकित फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून रेल्वे पोलीस ठाण्यात चोरट्या विरुद्ध परळी रेल्वे पोलीस ठाण्यात मंगळवारी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती परळी रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर सोगे यांनी लोकमतशी बोलताना दिली. दरम्यान, घटनास्थळी रेल्वे पोलीस  स्टेशन परळी व आर पी एफ च्या अधिकारी व पोलिस कर्मचारी यांनी भेट दिली आहे.

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारीBeedबीड