शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 23:52 IST

तालुक्यातील २२२ महामर्गावरील भेंड फाटयाजवळ माजलगावहून नाशिककडे फळे आणण्यासाठी जाणाºया व्यापाऱ्यांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला.

गेवराई : तालुक्यातील २२२ महामर्गावरील भेंड फाटयाजवळ माजलगावहून नाशिककडे फळे आणण्यासाठी जाणाºया व्यापाऱ्यांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. याप्रकरणी तलवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.माजलगाव येथील फळविक्रेते फारुक हमीद यांच्यासोबत इतर दोघे जण नाशिक येथून फळेआणण्यासाठी भाड्याच्या पिकअप ( क्र. एमएच २२ एए ३०३६ ) मधून सोमवारी रात्री जात होते. रात्री १० च्या सुमारास चहा पिण्यासाठी गेवराई तालुक्यातील भेंड फाटा येथे थांबले. त्यावेळी तीन ते चार चोरटे तेथे आले व व्यापाºयाला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दोन लाख रुपये लुटले. चहा पिण्यासाठी थांबल्यानंतर आपल्याकडे पैसे असल्याचे त्या चोरट्यांना कसे कळले त्यांनी चाकूचा धाक आपल्यालाच का दाखवला, असा प्रश्न व्यापाºयांना पडला होता. त्यानंतर फळे आणण्यासाठी जे पिकअप भाड्याने घेतले होते त्याच्या चालकावर त्यांनी संशय व्यक्त केला. त्यानंतर मंगळवारी तलवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशय असलेल्या पिकअप चालकाची सखोल चौकशी केली असता या कटामध्ये त्याचा हात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई उपअधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उनवणे, बहिरवाळ, वडकर, मुंजाळ यांनी केली. इतर आरोपींचा शोध आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीBeed policeबीड पोलीस