शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मारहाण करून सोने लुटले; ते विकून पार्टी करायला जाण्यापूर्वीच दरोडेखोर पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:59 IST

एलसीबीची कारवाई, सात पैकी चौघांना बेड्या

बीड : रात्रीच्यावेळी अचानक घरात प्रवेश करत महिला, पुरुषांना मारहाण करून महिलांच्या अंगावरील दागिने आणि इतर मुद्देमाल घेऊन पळून जायचे, अशी मोडस असणाऱ्या सात पैकी चार दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी बेड्या ठाेकल्या. लुटलेले सोने विक्री करून आलेल्या पैशांची पार्टी करायला जात असतानाच पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले.

निखील बंडू काळे (वय २०), अविनाश बंडू काळे (वय २४), रजाक जनार्धन काळे (वय ५५) आणि बाबासाहेब उर्फ चौऱ्या चंद्रभान चव्हाण (वय ३०, सर्व रा. टाकळी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) अशी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. हे सर्व दरोडेखोर रात्रीच्यावेळी शेतातील वस्तींवर घरी जातात. हातात काठ्या, तलवारींसह इतर शस्त्रे सोबत घेतात. घराबाहेर झाेपलेले किंवा घरात झोपलेल्या लोकांना दरवाजा वाजवून उठवतात. काही समजण्याच्या आतच मारहाण करायला सुरुवात करतात. अवघ्या काही क्षणात घरातील मौल्यवान वस्तू आणि महिलांच्या अंगावरील दागिने घेऊन दुचाकीवरून पळ काढतात. शिरूर तालुक्यातील बारगजवाडी येथे १९ फेब्रुवारी तर २८ जानेवारी रोजी गेवराई तालुक्यातील बंगाली पिंपळा येथे दरोडे पडले होते. पोलिसांनी शोध लावत सात पैकी चार दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून दुचाकीसह मोबाइल जप्त केले आहेत. सोनेही जप्त केले जाणार आहे.

ही कारवाई पाेलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजयसिंह झोनवाल, उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे, श्रीराम खटावकर, सुशांत सुतळे, तुळशीराम जगताप, हवालदार मनोज वाघ, कैलास ठोंबरे, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, राहुल शिंदे, दीपक खांडेकर, बाळू सानप, विकास वाघमारे, विकी सुरवसे, आलीम शेख, सुनील राठोड, सिद्धेश्वर मांजरे आदींनी केली.

पार्ट्या केल्या, दारू ढोसलीचोरी करून आलेले सोने विक्री केले. त्याच पैशांवर या दरोडेखोरांनी पार्टी केली. नंतर दारूही ढोसली. मंगळवारी देखील ते पार्टी करण्यासाठीच शिरूर तालुक्यातील पिंपळनेर फाटा येथे आले होते. त्याचवेळी एलसीबीने सापळा रचून त्यांना बेड्या ठोकल्या.

सर्व दरोडेखोर एकमेकांचे नातेवाईकअटक आरोपींमध्ये अविनाश आणि निखील हे दाेघे सख्खे भाऊ आहेत. तर रजाक काळे हा त्यांचा चुलता आहे. तसेच फरार तिघेजणही यांचेच नातेवाईक आहेत.

महिला बनली रणरागिणीबारगजवाडी येथे दरोडा टाकत असताना एका महिलेला मारहाण केली. यावेळी त्या महिलेने बाजूलाच असलेला लोखंडी चिमटा उचलून एकाच्या डोक्यात घातला. महिलेचा हा रूद्रावतार पाहून दरोडेखोरांनी धूम ठोकली. या मारहाणीत एक जण रक्तबंबाळ झाला होता, असे अटक दरोडेखोरांनी पोलिसांना सांगितले आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी