शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

रोडरोमिओने घेतला मुलीच्या पित्याचा बळी; संतप्त नातेवाईकांचा मृतदेहासह पोलीसठाण्यात ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 16:20 IST

अल्पवयीन मुलीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल केले, जाब विचारताच अल्पवयीन मुलीच्या पित्याला जीवे मारण्याची धमकी दिली.

- दीपक नाईकवाडेकेज ( बीड ): रोडरोमिओच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीच्या पित्याचा आज सकाळी उपचारादरम्यान लातूर येथे मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्य आरोपी भागवत चाटे आणि त्याच्या साथीदारांना त्वरित अटक करण्याची मागणी करत संतप्त नातेवाईकांनी रमेश नेहरकर यांचा मृतदेह केज पोलिस ठाण्यात आणत ठिय्या दिला आहे. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह पोलिस ठाण्यातून हलवणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

सोशल मीडियात फोटो व्हायरल केल्याचा जाब विचारताच रोडरोमिओ भागवत चाटे याने अल्पवयीन मुलीच्या पित्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शनिवारी दुपारी दोन साथीदारांच्या मदतीने पाठलाग करून हल्ला केला होता. आज हल्ल्यात गंभीर जखमी पित्याचा लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, संतप्त नातेवाईकांनी आरोपीच्या अटकेची मागणी करत नेहरकर यांचा मृतदेह  दुपारी केज पोलिस ठाण्यात आणून ठेवत ठिय्या सुरु केला आहे. मागील तीन तासांपासून नातेवाईक पोलीस ठाण्यात आहेत. आरोपींच्या अटकेनंतरच मृतदेह पोलीस ठाण्यातून हलवून अंत्यसंस्कार करू या मागणीवर नातेवाईक असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र नातेवाईक काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. याची माहिती मिळताच सहायक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांनी मृताच्या नातेवाईकांशी चर्चा केली. आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले तरीही नातेवाईक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी