शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

गोर-गरिबांच्या सौभाग्य योजनेतून दिली रो-हाउस प्रकल्पाला वीज; माजलगावात महावितरणचे अभियंता-लाइनमन निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 18:49 IST

वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता नीलेश तलांडे व लाइनमन चेतन भंडारकर  या दोघांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

माजलगाव (बीड ) : केंद्र सरकारच्या सौभाग्य योजनेअंतर्गत गोर-गरीबांना वीज कनेक्शन देण्याऐवजी येथील शिवशारदा रो-हाउस प्रकल्पाला वीज कनेक्शन व ट्रान्सफॉर्मर देण्यात येत असल्याचे उघडकीस झाले. यावरून वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता नीलेश तलांडे व लाइनमन चेतन भंडारकर  या दोघांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

महावितरणाच्या सौभाग्य योजनेमध्ये मोफत वीज जोडणीसाठी लाभार्थी कुटुंबांची पात्रता 2011 च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे निश्चित करण्यात येत. येणार आहे. ज्या लोकांचे नाव यादीत समाविष्ट आहे त्यांना मोफत वीज कनेक्शन व एलइडी बल्ब देण्यात येतो ,ज्या ठिकाणी विजेच्या खांबांची व्यवस्था नाही तेथे खांब उभे करून मोफत कनेक्शन व ट्रान्सफॉर्मर दिले जाते. जेथे लाइनची व्यवस्था नाही तेथे सौरऊर्जा प्लेट व एलइडी बल्ब देण्यात येतात. 

मात्र, या योजनेतील गरजूंना वीज देण्याऐवजी माजलगाव ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता नीलेश रतन तलांडे व लाइनमन चेतन मनोहर भंडारकर यांनी शहरास खेटून असलेल्या शिवशारदा रो-हाउसेसला सौभाग्य योजनेतून ट्रान्सफॉर्मर बसवण्याचा घाट घातला. त्यांनी केसापुरी वसाहत ते फुले पिंपळगाव रोड अशी एचटी लाइन उभी केली येथे नवीन सहा खांब उभे केले. मात्र, कागदोपत्री रो-हाउसला कनेक्शन न म्हणता आमराई वस्ती,फुले पिंपळगाव रोड असे दाखवून वरिष्ठांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता या दोन्ही गावांच्या हद्दीत आमराई वस्ती कोठेच नाही असा अहवाल संबंधित गावच्या ग्रामसेवकांनी दिला. 

या प्रकरणी फुले पिंपळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शेख जुनेद यांनी वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांचेकडे असा प्रकार घडत असल्याची तक्रार केली. त्याची बकोरिया यांनी तात्काळ दखल घेतली व चौकशीचे आदेश दिले. अधीक्षक अभियंता बि. एस. निर्मळ व अंबाजोगाई येथील कार्यकारी अभियंता वग्यानी यांनी प्रत्यक्ष पाहणी व  चौकशी केली असता त्यामध्ये अभियंता तलांडे व लाइनमन भंडारकर दोषी असल्याचे दिसून आले. त्यावरून अधीक्षक अभियंता निर्मळ यांनी तलांडे व लाइनमन भंडारकर यांना मंगळवारी  निलंबित केल्याची माहिती कार्यकारी अभियंता वग्यानी यांनी दिली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजsuspensionनिलंबनgovernment schemeसरकारी योजना