शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

चौकशी दरम्यान दोषी आढळल्यास निवृत्त अधिकाऱ्यांवर देखील कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 23:49 IST

राजापूर वाळू प्रकरणानंतर कोणत्या अधिकाºयाला किती हप्ता दिला जातो, या यादीसह निवेदन वाळू ठेकेदार व वाहतूकदार यांनी दिले होते. या प्रकरणाची चौकशी लवकरच पूर्ण होईल. तसेच यामध्ये दोषी असणा-या सर्वांवर कारवाई केली जाईल. जरी तो अधिकारी निवृत्त झाला असला तरी देखील त्याच्यावर कारवाई होईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.

ठळक मुद्देहर्ष पोद्दार : शांततामय वातावरणासाठी पोलीस प्रशासन सज्ज; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

बीड : राजापूर वाळू प्रकरणानंतर कोणत्या अधिकाºयाला किती हप्ता दिला जातो, या यादीसह निवेदन वाळू ठेकेदार व वाहतूकदार यांनी दिले होते. या प्रकरणाची चौकशी लवकरच पूर्ण होईल. तसेच यामध्ये दोषी असणा-या सर्वांवर कारवाई केली जाईल. जरी तो अधिकारी निवृत्त झाला असला तरी देखील त्याच्यावर कारवाई होईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. गणेशोत्सव व मोहरम सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त व नियोजन करण्यात आले आहे. या सर्व नियोजनाची माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते.यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक स्वप्नील राठोड, पो.नि. मानकर, पीएसआय सुभाष महाले यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना पोलीस अधीक्षक पोद्दार म्हणाले, सण-उत्साह शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. यावर्षी बीड जिल्ह्यात १३५४ गणेश मंडळांनी नोंदणी केली आहे. यापैकी ४३० गणेश मंडळ हे एक गाव एक गणपती या उपक्रमांतर्गत बसवण्यात आले आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी यावर्षी जिल्ह्यातील ६४ व बाहेरील, असे मिळून ८४ पोनी. व सपोनि हे कार्यरत असणार आहेत. तसेच १२०० पोलीस कर्मचारी व ११०० होमगार्ड व एसआरपीएफची एक कंपनी तैनात असणार आहे.तसेच ५५१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गैरप्रकार टाळण्यास मदत होणार आहे. याव्यतिरिक्त तंत्रज्ञानाचा वापर करुन सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्यांचा देखील वापर केला जाणार आहे. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर विशेष नजर असणार आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाचे अधिकारी व कर्मचारी साध्या वेशात गर्दीच्या ठिकाणी टेहळणी करणार आहेत. कॅमेºयांनी अद्ययावत असणारी सर्व्हीलन्स मोबाईल व्हॅन गस्त घलणार आहेत. या सर्व प्रक्रियेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखील पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक पोद्दार यांनी केले आहे.मराठवाड्यात प्रथम उपक्रमउत्सवाच्या कालावधित पोलीस प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक व सण उत्सवाच्या दरम्यान दंगल रोखण्यासाठी अद्यावत उपक्रमांचा वापर केला जाणार आहे. यामध्ये बीड व अंबाजोगाई या दोन्ही विभागांना कॅमेरे असलेले मोबाईल व्हॅन दिली जाणार आहे. हा उपक्रम मराठवाड्यात प्रथमच राबवला जाणार आहे. दंगलसदृश्य प्रसंग आला तर त्या ठिकाणी ती गाडी जाऊन तेथील परिस्थितिचे प्रक्षेपण थेट मुख्यालयात होईल व या आधारावर गुन्हे दाखल करण्यास देखील मदत होणार आहे. त्यासाठी शहरातील कॅमेºयांची देखील मदत घेतली जाईल. तसेच गर्दी पांगवण्यासाठी पाण्याचा मारा करणारी गाडी देखील तैनात केली गेली आहे. ही सर्व फक्त तयारी करण्यात आली आहे. मात्र, असे प्रसंग घडू नयेत यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे देखील पोद्दार यावेळी म्हणाले.

टॅग्स :BeedबीडBeed S Pपोलीस अधीक्षक, बीडsandवाळूPoliceपोलिस