शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

दुष्काळ तोंडावर असताना आरक्षित पाण्याचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:20 IST

परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पुढील काळात माजलगाव तालुक्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. माजलगाव धरणातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. धरणात सध्या असलेले पाणी पुढील चार ते पाच महिने केवळ पिण्यासाठी पुरु शकते, अशी परिस्थिती असताना धरण बॅकवॉटरवरून मोठ्या प्रमाणावर मोटारीद्वारे पाण्याचा बेसुमार उपसा होत आहे. यावर अंकुश न ठेवल्यास मोठ्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.

ठळक मुद्देहजारो मोटार रात्रंदिवस चालू : कार्यवाही शून्य, माजलगाव धरण भर पावसाळ्यात वजा ५ टक्के

पुरुषोत्तम करवा ।लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पुढील काळात माजलगाव तालुक्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. माजलगाव धरणातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. धरणात सध्या असलेले पाणी पुढील चार ते पाच महिने केवळ पिण्यासाठी पुरु शकते, अशी परिस्थिती असताना धरण बॅकवॉटरवरून मोठ्या प्रमाणावर मोटारीद्वारे पाण्याचा बेसुमार उपसा होत आहे. यावर अंकुश न ठेवल्यास मोठ्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.माजलगाव धरण हे बीड, माजलगाव आणि किमान ७० ते ८० गावांसाठी वरदान आहे. पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या या धरणामुळे सुटली असली तरी यावर्षी पावसाचे प्रमाण नगण्य राहिल्यामुळे धरण भर पावसाळ्यात जोत्याखाली आहे.असे असले तरी सध्या धरणात असलेल्या पाण्यावर पिण्याच्या पाण्याची गरज पुढील किमान ४ ते ५ महिने भागू शकते कारण उन्हामुळे होणारे बाष्पीभवन आणि पाणीपुरवठा वगळता धरणाच्या पाण्यातून होत असलेला बेसुमार पाणी उपसा हा भविष्यातील गंभीर परिस्थितीचे करण ठरू लागले आहे. प्रशासनाच्या वतीने उपलब्ध असलेला जलसाठा हा केवळ पिण्यासाठी आरक्षित केलेला असताना बेसुमार उपशामुळे धरणाची पातळी दिवसेंदिवस कमालीची खालावत चालली आहे. सध्या धरणाची पाणी पातळी ही वजा ५ टक्के इतकी घटली असून शनिवारी पाणी पातळी ही ४२५.५९ मी. इतकी होती. तर उपयुक्त साठा हा १२६.७० दलघमी इतका कमी असल्यामुळे आता शेती व परळी येथील थर्मलला पाणी देणे आता शक्य होणार नाही. उपलब्ध साठा केवळ आणि केवळ पिण्यासाठीच पुरु शकतो, अशी माहिती धरण अभियंता राजेंद्र दहातोंडे यांनी दिली.कार्यवाहीसाठी पथक नियुक्तमाजलगाव धरणातून व इतर जल साठ्यांमधून पाणी चोरी रोखण्यासाठी प्रशासनाने शुक्रवारी उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, महावितरण, पाटबंधारे विभागाचे अधिकारी व अभियंते यांची बैठक घेण्यात येऊन पाणी संरक्षणासाठीच्या उपाययोजनांची समीक्षा करण्यात आली. महसूल, पोलीस, पाटबंधारे, महावितरणच्या लोकांचे एक पथक तयार करण्यात आले असून,कार्यवाही बाबतचे पूर्ण अधिकार त्यांना देण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार एन.जी. झम्पलवाड यांनी दिली.नदी पात्रातूनही उपसामाजलगाव धरणा खालोखाल सिंदफणा नदी पात्रातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा सुरू असून, नदी पत्रातील पाणी चोरीवर देखील कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणwater shortageपाणीटंचाई