शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ३० वर्षांनंतर बीडकडे प्रतिनिधित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 4:16 PM

अनेक वर्षांपासून कॉँग्रेसकडे असलेली जागा भाजपने खेचून आणली आहे. बीड जिल्ह्याकडे ३० वर्षानंतर या मतदार संघाचे प्रतिनिधित्व आले आहे.

बीड : लातूर- बीड - उस्मानाबाद विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस विजयी झाले. अनेक वर्षांपासून कॉँग्रेसकडे असलेली जागा भाजपने खेचून आणली आहे. बीड जिल्ह्याकडे ३० वर्षानंतर या मतदार संघाचे प्रतिनिधित्व आले आहे. 

जिल्ह्यातील सध्या बदलत असलेल्या राजकीय समिकरणातून भाजपला हे यश मिळाले असल्याने आगामी निवडणूकीत ते फायद्याचे ठरणार असल्याचे मानले जात आहे. तर या निकालाने राष्ट्रवादी कॉँग्रेसला संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने चिंतन करावे लागणार आहे. जिल्हयातील राष्ट्रवादी कॉँग्रेसची घडी विस्कटल्याने तसेच कॉँग्रेस व राष्ट्रवादीत समन्वयाचा अभाव राहिल्याने भाजपची सरशी झाली. जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी निकालावर सावध भाष्य केले. 

३० वर्षानंतर बीड जिल्हयाकडे प्रतिनिधित्व

लातूर- बीड - उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे प्रतिनिधीत्व ३० वर्षानंतर बीड जिल्हयाकडे या निवडणुकीच्या निमित्ताने आले आहे. यापूर्वी स्व. बाबुराव आडसकर यांनी प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर उस्मानाबादकडे व नंतर लातूरकडे १८ वर्ष हे प्रतिनिधीत्व होते. या निवडणुकीच्या निमित्ताने आष्टी मतदार संघाचे भाग्य उजळले.

जिल्ह्यातील चौघे विधान परिषदेवर

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले सुरेश धस यांना २०१९ च्या निवडणुकीआधीच आमदारकीची संधी मिळाली. आष्टी- पाटोदा -शिरुर मतदार संघाला दोन आमदार लाभल्याने विकासाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडीत, शिवसंग्रामचे विनायक मेटे यांच्यानंतर सुरेश धस हे विधान परिषदेचे जिल्ह्यातील चौथे सदस्य आहेत. 

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसBJPभाजपाVidhan Parishadविधान परिषद