सोमवारी मेलेल्या कावळ्याचा अहवाल आला पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:38 AM2021-01-16T04:38:32+5:302021-01-16T04:38:32+5:30

: तालुक्यातील टालेवाडी येथे सोमवारी मरण पावलेल्या कावळ्याचा अहवाल शुक्रवारी बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने या परिसरासह ...

The report of the dead crow on Monday came positive | सोमवारी मेलेल्या कावळ्याचा अहवाल आला पॉझिटिव्ह

सोमवारी मेलेल्या कावळ्याचा अहवाल आला पॉझिटिव्ह

Next

: तालुक्यातील टालेवाडी येथे सोमवारी मरण पावलेल्या कावळ्याचा अहवाल शुक्रवारी बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने या परिसरासह तालुक्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. माजलगाव-तेलगाव रस्त्यावर असलेल्या टालेवाडी येथे सोमवारी मेलेला कावळा आढळला होता. याबाबत गावकऱ्यांनी पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी संपर्क साधला व याबाबतची माहिती दिली.

नित्रुड येथील पशुसंवर्धन अधिकारी यांनी हा कावळा बीड पशुचिकित्सालयाकडे पाठवून दिल्यानंतर त्या कावळ्याला पुणे येथे पाठवण्यात आले.

या कावळ्याचा अहवाल शुक्रवारी दुपारी पाॅझिटिव्ह आला असल्याने टालेवाडी परिसर व तालुक्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. या ठिकाणी पशुसंवर्धन अधिकारी तळ ठोकून बसले असून नागरिकांनी न घाबरता कोंबड्या किंवा कावळा सापडल्यास आमच्याशी संपर्क करावा, असे आवाहन नित्रुड येथील पशुसंवर्धन अधिकारी एस. एस. म्हेत्रे यांनी केले आहे.

Web Title: The report of the dead crow on Monday came positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.