शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

फोनवरून मागितली खंडणी; सीआयडी वाल्मीक कराडचा आज घेणार व्हाईस सॅम्पल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 11:27 IST

सीआयडी विष्णू चाटेच्या घराचीही घेणार झडती, चाटेच्या मोबाइलचा शोध लागेना

बीड : मस्साजोगमधील अधिकाऱ्याला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड याचे व्हाइस सॅम्पल बुधवारी घेतले जाणार आहे. तसेच दुसरा आरोपी विष्णू चाटे याच्या घराची झडतीही घेतली जाणार आहे. त्याचा मोबाइल जप्त करण्यासाठी सीआयडीकडून तपास सुरू आहे.

केज तालुक्यातील मस्साजाेग येथील पवणचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी केज ठाण्यात वाल्मीक कराडसह विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यातील चाटेला अटक केली होती, तर कराड हा शरण आला आहे. घुले हा सध्या सरंपच संतोष देशमुखह हत्या प्रकरणात आरोपी आहे. मंगळवारी चाटेला न्यायालयात हजर केले होते. त्याने मोबाइल दिला नाही. तसेच तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगत सीआयडीने त्याची पोलिस कोठडी घेतली होती. जवळपास २० दिवसांपासून चाटे हा सीआयडीच्या कोठडीत आहे, तर कराडदेखील सध्या अटकेत आहे. परंतु, तपासात काय उघड झाले, हे मात्र सीआयडीकडून सांगितले जात नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

कराडचे फोनवर संभाषणअधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीत विष्णू चाटे याच्या मोबाइलवरून वाल्मीक कराड याचे संभाषण झाले होते. त्यामुळे त्याचे व्हाईस सॅम्पल घेण्यासह इतर १३ मुद्द्यांवर कराडची काेठडी घेतली होती. त्याप्रमाणे बुधवारी त्याचे व्हाईस सॅम्पल घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सरपंच हत्या प्रकरणात मौनसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही सात आरोपी सीआयडी कोठडीत आहेत. परंतु, त्यांच्याकडून तपासात काय समोर आले, याबाबत सीआयडीकडून मौन बाळगले जात आहे.  तपासावर गोपनीयता पाळली जात आहे.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडwalmik karadवाल्मीक कराड