शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रणजित कासले याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टाबाहेर सरकारविरोधात दिल्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 16:55 IST

बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला काल दिल्लीतून पोलिसांनी अटक केली. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि सायबर विभागात कासले विरोधात कालच दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला काल दिल्लीतून पोलिसांनी अटक केली. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि सायबर विभागात कासले विरोधात कालच दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच मुंबईत देखील कासले विरोधात गुन्हा दाखल आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोप प्रकरणात कासलेला अटक केली. आज मुंबईतील किल्ला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

'मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा

रणजित कासले याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी किल्ला कोर्टाने सुनावली आहे. यावेळी पोलिस कासले याला कोर्टाच्या बाहेर घेऊन जात असताना कासले याने सरकारविरोधात घोषणा दिल्या. कासले याने "इंकलाब जिंदाबाद, महाराष्ट्र सरकार हाय हाय", अशा घोषणा दिल्या. 

दोन प्रकरणात गुन्हा दाखल

वादग्रस्त बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासले याच्यावर बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या तक्रारींवरुन दोन गुन्हे दाखल करण्यात आले. बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन अघाव यांच्या तक्रारीवरुन सामाजिक शांतता भंग केल्या प्रकरणी, तसेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे हे प्रकरण आहे. तर दुसरा गुन्हा मंत्री संजय शिरसाट यांच्याबद्दल बदनामीकारक भाष्य सोशल मिडीयातून केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी ही तक्रार दिली. या दोन्ही तक्रारीवरुन पोलिसांनी कारवाई केली.  या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

 रणजित कासलेच्या विरोधात यापूर्वी बीड, परळी, अंबाजोगाई यासह मुंबईतही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आता नव्याने दोन गुन्हे दाखल झाल्याने कासले समोरील अडचणी वाढल्या आहेत. काही दिवसापूर्वीच रणजित कासले याला जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर कासले याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन आरोप सुरू केले होते. 

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिस