शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
4
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
5
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
6
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
7
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
8
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
9
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
10
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
11
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
12
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
13
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
14
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
15
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
16
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
17
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
18
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
19
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
20
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा

रणजीत कासले बडतर्फ, हवालदार अन् चालकही निलंबीत; पण सायबरच्या ठाणेदारांचे काय? 

By सोमनाथ खताळ | Updated: April 19, 2025 17:01 IST

बीडच्या सायबर ठाण्यातील गैरप्रकाराला अभय कोणाचे?

बीड : पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांना महागडा आय टॅब दिला असा दावा करण्यासह अनेकांवर आरोप करणाऱ्या सायबर ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले याला बडतर्फ केले. त्याच्यासोबत हवालदार आणि चालक असे दोघांचेही निलंबन झाले. एकाच ठाण्यातील तिघांवर गंभीर प्रकरणात कारवाई झाली, परंतू येथील ठाणेदार अजूनही बिनधास्त आहेत. त्यांच्यावर कारवाईसाठी वरिष्ठांकडून अभय दिले जात असल्याचा आरोप होत आहे. कारवाईतील या दुजाभावामुळे पोलिस अधीक्षकांबाबत त्यांच्याच कर्मचाऱ्यांत नाराजी आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून बीड पोलिस वादात सापडले. या प्रकरणात अधिकारी निलंबीत झाले. त्यानंतरही अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी आरोपींना मदत करत राहिले. नवनीत काँवत यांनी पोलिस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यावर थोडा वचक राहिल, असे वाटत होते. परंतू या अपेक्षा फोल ठरत आहेत. कारण आजही पोलिस अधिकारी, कर्मचारी गैरप्रकार करतच असल्याचे समोर आले आहे.

प्रमुखांसह एलसीबी शाखाच वादातस्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख हे एलसीबीत आल्यानंतर ते कसे आले, याची कहाणी भाजपचे आ.सुरेश धस यांनी सांगितली होती. सोबतच त्यांच्या शाखेतील उपनिरीक्षक महेश विघ्नेंसह सानप व इतर कर्मचाऱ्यांवरही गंभीर आराेप केले. तसेच चोरी, घरफोडीचे गुन्हेही उघड करण्यात शाखा अपयशी ठरली. एखादी कारवाई केली की त्याचा बोभाटा केला जातो. न्यायालयाचा निकाल बदल प्रकरण, आठवले गँगमधील फरार आरोपी मोकाट, असे अनेक प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. याचा आढावा घेण्याऐवजी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडून या शाखेला 'झकते माप' दिले जात असल्याचा आरोप होत आहे.

अहवाल दिला, पण पुढे काय?सायबर पोलिस ठाण्यातील कासले बडतर्फ तर हवालदार रामदास गिरी, चालक बळीराम भाग्यवंत यांचे निलंबण झाले. परंतू पोलिस निरीक्षक देविदास गात यांच्यावर कसलीही कारवाई नाही. अधीक्षक काँवत यांनी गात यांचा अहवाल विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविल्याचा दावा केला, मग पुढे कारवाई का नाही? असा प्रश्न आहे. महानिरीक्षकांकडून अभय दिले जात आहे का? असा प्रश्नही आहे.

पोलिस निरीक्षकांकडून एसपींच्या नावाचा गैरवापरअधीक्षक काँवत यांच्या नावाचा वापर करून पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांनी शुक्रवारी पोलिस अधीक्षक कार्यालयातून माध्यम प्रतिनिधींना बाहेर जा, असे फर्मान सोडले. यावर काँवत यांनी आपण असे काहीच सांगितले नाही, असे म्हणत हात झटकले. परंतू पुढे शेख यांना विचारण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. काँवत यांनी सोयीनुसार घेतलेल्या भूमिकेबद्दलही माध्यम प्रतिनिधींनी संताप व्यक्त केला.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीडPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम