शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र मस्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:09 IST

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी झाली. यावेळी पक्षाने सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदाची धुरा ही राजेंद्र मस्के यांच्याकडे सोपावली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माजी सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख यांनी काम पाहिले.

ठळक मुद्देप्रीतम मुंडे : भाजपचा बालेकिल्ला मजबूत ठेवण्याची जबाबदारी राजेंद्र मस्के निभावतील; पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

बीड : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी झाली. यावेळी पक्षाने सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदाची धुरा ही राजेंद्र मस्के यांच्याकडे सोपावली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माजी सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख यांनी काम पाहिले. यावेळी मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख, खा.डॉ.प्रीतम मुंडे, आ.सुरेश धस यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.खा. मुंडे म्हणाल्या, जिल्हा हा कायम भारतीय जनता पार्टीसाठी महत्त्वाचा राहिला आहे. स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्ष व कार्य कर्तृत्वाने कार्यकर्ते, भाजपासाठी बालेकिल्ला ठरला आहे. राज्यात व जिल्ह्यात राजकीय परिस्थिती प्रतिकूल असल्याने वेळोवेळी लोकांच्या कामासाठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे. संघर्षाचे नेतृत्व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन एकजुटीने नूतन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे प्रामाणिकपणे पार पाडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.रमेश आडसकर, विजयकुमार पालसिंगणकर, केशव आंधळे, आदिनाथराव नवले, भिमराव धोंडे, राजाभाऊ मुंडे, रमेश पोकळे, सर्जेराव तांदळे, योगिनी थोरात, वैजनाथ मिसाळ, राणा डोईफोडे, अशोक लोढा, विजयकांत मुंडे, भारत काळे, नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जयश्री मुंडे, सुभाष धस, बीड शहराध्यक्ष जगदीश गुरखुदे, बीड शहर व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडBJPभाजपाPritam Mundeप्रीतम मुंडेSubhash Deshmukhसुभाष देशमुख