शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

परळीतून राजेभाऊ फड यांची माघार, आता धनंजय मुंडे- राजेसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 19:18 IST

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 35 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले

- संजय खाकरेपरळी ( बीड): राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कृषी मंत्री धनंजय मुंडे व महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. तुल्यबळ म्हणून चर्चेत आलेले राजेभाऊ फड यांनी माघार घेतली आहे.

परळी विधानसभा मतदारसंघात एकूण  58 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दहा उमेदवारांचे अर्ज छाननी मध्ये अवैध ठरले होते. 48 उमेदवारांचे अर्ज छाननी मध्ये वैध ठरले होते. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी एकूण 35 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले आहे. यापूर्वी दोघाजणांनी उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता 11 उमेदवार राहिले आहे. अपक्ष उमेदवारी दाखल केलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक नेते राजेभाऊ फड, अपक्ष उमेदवार राजेश देशमुख  व प्रभाकर वाघमोडे, दिलीप  बिडगर यांच्यासह एकूण 37 जणांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. यामुळे महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे धनंजय पंडितराव मुंडे व महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब श्रीकिशन देशमुख या दोघांमध्ये सरळ लढत होईल.

11 उमेदवार आहेत रिंगणात:धनंजय पंडितराव मुंडे  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट  , राजेसाहेब श्रीकिशन देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, डी एल उजगरे बहुजन समाज पार्टी, केदारनाथ जाधव पीजेंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया. भागवत वैद्य विकास इंडिया पार्टी , साहस  आदोडे मराठवाडा मुक्ती मोर्चा, अल्ताफ खाजा मिया सय्यद अपक्ष ,दयानंद लांडगे अपक्ष, राजेसाहेब सुभाषराव देशमुख अपक्ष ,शाखेर अहमद शेख अपक्ष, हिदायत सादिक अली सय्यद अपक्ष यांचा समावेश आहे. ... 

यांनी घेतली माघार :राजाभाऊ श्रीराम फड, जयवंत ऊर्फ राजेश देशमुख, दिलीप बिडगर, प्रभाकर वाघमोडे, राजश्री धनंजय मुंडे, प्रमोद बिडगर, सेवकराम जाधव, मुस्तफा मैनोदीन शेख यांच्यासह एकूण 37 जणांनी माघार घेतली आहे. 

मत विभाजन टाळण्यासाठी माघार - राजेभाऊ फडपरळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र  पवार  पक्षाच्या मतात फूट पडून पक्षाचे नुकसान होऊ नये यासाठी मी निवडणुकीतून माघार घेतली. आगामी काळात तेवढ्याच ताकदीने पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करणार असल्याचे युवक नेते राजेभाऊ फड यांनी सांगितले. सोमवारी त्यांनी आपला अपक्ष भरलेला उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेऊन पक्षाचे काम निष्ठेने करणार असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४parli-acपरळीmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकDhananjay Mundeधनंजय मुंडे