शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

गारपीटग्रस्तांना तत्काळ नुकसान भरपाई द्या; प्रकाश सोळंके यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 18:19 IST

माजलगांव तालुक्यातील अनेक गावांना रविवारी झालेल्या गारपिटीने तडाखा दिला. यात झालेल्या नुकसानीची पाहणी आज दुपारी माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केली. या वेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीची मदत देण्याची मागणी केली. 

माजलगांव (बीड ) : तालुक्यातील अनेक गावांना रविवारी झालेल्या गारपिटीने तडाखा दिला. यात झालेल्या नुकसानीची पाहणी आज दुपारी माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केली. या वेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीची मदत देण्याची मागणी केली. 

काल झालेल्या गारपिटीने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यातील मंगरूळ नंबर 2 येथे आज दुपारी माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके, जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, बाजार समितीचे सभापती अशोक डक, जयदत्त नरवडे, जिल्हा परिषद सदस्य कल्याण अबुज यांनी भेट दिली. येथे त्यांनी शेतकरी रवींद्र बापमारे यांच्या गारपिटीने नुकसान झालेल्या पपईच्या बागेची पाहणी केली. गारपिटीने संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाल्याने जवळपास 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर त्यांनी काळेगाव, दुब्बाथडी या शिवारात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या शिवारातील हरभरा, ज्वारी, गहू, कापूस व पपई, अंबा, केळी, टरबूज, खरबूज आदी फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.  

सरसकट पंचनामे करा गारपिटीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे सरसकट पंचनामे करून शेतक-यांना तत्काळ प्राथमिक मदत द्यावी, पुढील कारवाई लवकरात लवकर करून योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सोळंके यांनी यावेळी केली. यासोबतच मागील तीन वर्षांपासून शासन केवळ शेतक-यांवर घोषणांचा पाऊस पडत आहे. प्रत्यक्ष मात्र त्यांनी कसलीही मदत दिलेली नाही अशी टीका डक यांनी केली.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस