शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'ग्लोबल आडगाव' ची भरारी, कोलकत्तानंतर न्यूजर्सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2022 14:41 IST

“ग्लोबल आडगाव” या मराठी चित्रपटाची जगभरात दखल घेतली जात आहे.

- पुरूषोत्तम करवामाजलगाव ( बीड): येथील रहिवासी अनिलकुमार साळवे लिखित व दिग्दर्शित सिल्वर ओक फिल्म्स व इंटरटेनमेंट प्रस्तुत, मनोज कदम निर्मित, अमृत मराठे सहनिर्मित “ग्लोबल आडगाव” या मराठी चित्रपटाची निवड अमेरिकेतील न्यूजर्सी मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे.

“ग्लोबल आडगाव” या मराठी चित्रपटाची जगभरात दखल घेतली जात आहे. या चित्रपटाची कोलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील निवड झाली होती. येथे देशविदेशातील नामवंतांनी चित्रपटाचे कौतुक केले. दिग्दर्शक अनुराग बसू, कांतारा चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक निरीक्षित देव तर परीक्षक साजीयन कडोनी यांनी चित्रपटाची बांधणी, कलाकारांचा नैसर्गिक अभिनय तंत्रशुद्ध बांधणी आणि दिग्दर्शनाचे प्रचंड कौतुक केले.

यानंतर आता अमेरिकेतील न्यूजर्सी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “ग्लोबल आडगाव” ची निवड झाली आहे. या महोत्सवात  हॉलीवूड, बॉलीवूडसह जगभरातील नामांकित कलावंत, दिग्दर्शक हजेरी लावणार आहेत. मराठीचे संगीत, संस्कृती आणि उद्दिष्टे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसारित व्हावेत या उद्देशाने हा महोत्सव घेतला जातो. नवीन वर्षात जानेवारी महिन्यादरम्यान चित्रपट बिग सिनेमा, 1655 ओक थ्री रोड एडिसन, न्यु जर्सी 08820, युनायटेड स्टेट येथे दाखवला जाणार आहे. 

अनिलकुमार साळवे यांनी यापूर्वी शिरमी व १५ ऑगस्ट या लघुपटाचे लेखन दिग्दर्शन केले होते. त्यांना नाट्यक्षेत्रातीत लेखनाबद्दल अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन रा.रा. दातार पुरस्कार मिळाला आहे. तर १५  ऑगस्ट लघुपटास लंडन येथील न्यूलीन इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलचा बेस्ट डिरेक्टर व बेस्ट फिल्म अवार्ड मिळाला आहे. १५ ऑगस्ट या लघुपटास भारतातील  सर्वांत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके, प्रभातचा व्ही. शांताराम बेस्ट फिल्म डिरेक्टर अवार्ड. केरळ, दिल्ली, राजस्थान, बंगलोर यासह  राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय ९१ पुरस्कार मिळाले आहेत. लघुपटाच्या उदंड यशानंतर सिल्वर ओक फिल्म्स अँड इंटरटेनमेंट प्रस्तुत तर राष्ट्रीय उद्योजकतेचा पुरस्कार प्राप्त निर्माते मनोज कदम निर्मित, अमृत मराठे सहनिर्मित “ग्लोबल आडगाव” हा पूर्ण लांबीचा चित्रपट केला आहे. “ग्लोबल आडगाव” चित्रपटाचे दोन प्रिव्हू पुणे व मुंबईत झाले, समिक्षकांनी भरभरुन कौतुक केले. 

क्रांतीचा संघर्ष - ग्लोबल आडगाव या चित्रपटात शेती मातीत राबणाऱ्या हातांचा समृद्ध संघर्ष आहे. उत्कंठावर्धक कथासूत्र, उपहासात्मक, मर्मभेदी संवाद, ग्रामीण माणसांच्या सजीव करणाऱ्या व्यक्तीरेखा, गावजीवनाचं भव्य उदात्त चित्रीकरण या चित्रपटात केले आहे. मराठवाड्यातील अस्सल भाषा म्हणी नैसर्गिक विनोद याने खुलणारे प्रसंग चित्रपटात आहेत. तसेच आदर्श शिंदे, गणेश चंदनशिवे व जसराज जोशी यांनी गायलेल्या विनायक पवार, प्रशांत मंडपुवार, अनिलकुमार साळवे यांनी लिहीलेल्या गाण्यांना समिक्षाकांनी उदंड प्रतिसाद दिला. “ग्लोबल आडगाव” म्हणजे शेती मातीतल्या पिढ्यांची जीवघेणी घुसमट आहे. बेरकी व्यवस्थेच्या भिंतीना तडा देणारा क्रांतीचा संघर्ष म्हणजेच ग्लोबल आडगाव आहे.

हे आहेत कलाकार या चित्रपटात अभिनेता सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, अनिल नगरकर, उपेन्द्र लिमये, रोनक लांडगे, अशोक कालगुडे, सिद्धी काळे, महेंद्र खिल्लारे, अनिल राठोड, संजीवनी दिपके, साहेबराव पाटील, शिवकांता सुतार, विष्णू भारती, ऋषिकेश आव्हाड, परमेश्वर कोकाटे, अभिजीत मोरे,  विष्णू चौधरी, रामनाथ कातोरे, विक्रम त्रिभुवन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीcinemaसिनेमाBeedबीड