शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निरीक्षकपदी प्रमोशन मिळाले अन् २४ तासांत निवृत्तही झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:45 IST

बीड : ३६ वर्षे पोलीस प्रशासनात नौकरी केली. याची पावती म्हणून प्रशासनाने त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून प्रमोशन दिले. त्यानंतर अवघ्या २४ तासांत ते लगेच निवृत्तही झाले. केवळ एका दिवसासाठी ते एपीआय चे पीआय बनले. अशा घटना क्वचितच घडतात. एकच दिवस त्यांना वर्ग १ चा अधिकारी म्हणून काम करता आले. असे ...

ठळक मुद्दे३६ वर्षे पोलीस खात्यात काम करून रमेश गायकवाड निवृत्त

बीड : ३६ वर्षे पोलीस प्रशासनात नौकरी केली. याची पावती म्हणून प्रशासनाने त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून प्रमोशन दिले. त्यानंतर अवघ्या २४ तासांत ते लगेच निवृत्तही झाले. केवळ एका दिवसासाठी ते एपीआय चे पीआय बनले. अशा घटना क्वचितच घडतात. एकच दिवस त्यांना वर्ग १ चा अधिकारी म्हणून काम करता आले. असे असले तरी आपली शेवटच्या दिवशी का होईना, पोलीस निरीक्षक होण्याची इच्छा पूर्ण झाली, अशी भावना पेठबीड पोलीस ठाण्यातील मंगळवारी निवृत्त झालेले पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. यावेळी ते भावूक झाले होते.

रमेश मारोतीराव गायकवाडे हे मुळचे औरंगाबादचे रहिवाशी. १९८२ साली ते पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हूणन औरंगाबादला रूजू झाले. त्यानंतर २००० साली खात्यांतर्गत परीक्षा दिली आणि २००१ साली ते पोलीस उपनिरीक्षक झाले. २०११ पुन्हा त्यांची सहायक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाली. मागील साडे तीन वर्षांपासून गायकवाड हे पेठबीड पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

गायकवाड यांना वर्षापूर्वीच पदोन्नती मिळणे अपेक्षित होते. परंतु पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रशासन विभागातील गलथान कारभारामुळे त्यांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला नाही. त्यामुळे गायकवाड थेट पोलीस महासंचालकांना भेटले. त्यांनी पदोन्नतीचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले. पुन्हा प्रस्ताव पाठविला परंतु न्यायालयाच्या आदेशाने सर्वच पदोन्नत्या रोखण्यात आल्या. पुन्हा प्रस्ताव पाठविला आणि ३० जुलै रोजी त्यांचे प्रमोशन झाल्याचा फॅक्स अधीक्षकांना आला.

पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी तात्काळ त्यांना बोलावून घेत प्रमोशन दिले. खांद्यावर तिसरा स्टार आणि रिबीन चढताच पेठबीड पोलीस ठाण्यात आनंदोत्सव करण्यात आला. एकीकडे आंनदोत्सव होत असला तरी गायकवाड यांच्या मनात मात्र ‘कही खुशी कही गम’ अशी भावना होती. केवळ निवृत्तीच्या आगोदर २४ तासाने प्रमोशन झाले. त्यामुळे काम करण्याची सर्व स्वप्ने अधुरे राहिले. तर दुसऱ्या बाजुला शेवटच्या दिवशी का होईना आपण वर्ग १ चा अधिकारी झालोत, याचा आनंद होता. उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोनि बी.एस.बडे यांच्या उपस्थितीत त्यांना मंगळवारी निरोप देण्यात आला.प्रामाणिक कर्तव्य बजावलेपोलीस दलात रूजू झाल्यापासून ते निवृत्ती पर्यंत प्रामाणिक कर्तव्य बजावले. खाकी बदनाम होणार नाही, यासाठी प्रयत्न केले. वर्षापुर्वीच प्रमोशन झाले नसले तरी शेवटच्या दिवशी का होईना मी पोलीस निरीक्षक झाल्याचा मला आनंद असल्याचे निरीक्षक रमेश गायकवाड म्हणाले.

गायकवाडसाठी त्यांचे मन ‘बडे’पेठबीड ठाण्याचे प्रमुख बी.एस.बडे यांनी आपले मोठे मन करीत गायकवाड यांना एका दिवसासाठी प्रभारी अधिकारी बनविले. काही तासांसाठी का होईना परंतु एकाच ठाण्यात दोन पोलीस निरीक्षक पाहण्याचा अनुभव कर्मचाºयांना आला.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसMarathwadaमराठवाडा