- विनोद ढोबळे लोकमत न्यूज नेटवर्कविडा (जि. बीड) : धूलिवंदनाच्या दिवशी गाढवावरून काढल्या जाणाऱ्या मिरवणुकीसाठी केज तालुक्यातील विडा गावात समितीला तीन जावयांनी यंदा हुलकावणी दिली. शेवटी गावातीलच ७० वर्षांचे जावई शिवाजी गालफाडे यांची गाढवावरून मिरवणूक काढली. त्यानंतर हनुमान मंदिराच्या पारावर त्यांना कपड्यांचा पूर्ण आहेर भेट देण्यात आला. यंदा सोन्याचे भाव वाढल्याने जावयाला अंगठी मात्र मिळाली नाही.
विडा गावात ९० वर्षांपासून धूलिवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. जावयाचा शोध घेताना समितीची नजर गावातील बाबूराव दुनघव यांचे जावई असलेले शिवाजी गालफाडे यांच्यावर पडली. विड्यात मागील ५० वर्षांपासून ते राहत असून त्यांचे वय ७० च्या घरात आहे. त्यांना पकडून ग्रामपंचायत कार्यालयात काही वेळ ठेवण्यात आले. धूलिवंदनाच्या दिवशी गाढवावर बसवून त्यांची मिरवणूक काढण्यात आली.
Web Summary : In Vida, sons-in-law avoided the traditional donkey procession. Ultimately, 70-year-old Shivaji Galfade participated. He received clothes as a gift, but no gold ring due to rising prices, continuing a 90-year tradition.
Web Summary : विदा में, युवा दामादों ने गधे पर निकलने वाले पारंपरिक जुलूस से परहेज किया। अंततः, 70 वर्षीय शिवाजी गालफाडे ने भाग लिया। उन्हें उपहार स्वरूप कपड़े मिले, लेकिन बढ़ती कीमतों के कारण सोने की अंगूठी नहीं मिली, जो 90 साल पुरानी परंपरा को जारी रखता है।