शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रीतमताई घरी बसतील, तुम्ही लढा,असे चालणार नाही; पंकजा मुंडेंचा पक्ष नेतृत्वाला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 14:41 IST

आता आपल्याला त्रास देणाऱ्याचे घर उन्हात बांधू. आता माझ्या माणसांना त्रास होऊ देणार नाही. आता संयम नाही.

सावरगाव ( बीड): माझ्याकडे फक्त नीतीमत्ता आहे.कोण म्हणते मी या पक्षात चालले, त्या पक्षात चालले. त्रिदेवांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागतले. आता आपल्याला त्रास देणाऱ्याचे घर उन्हात बांधू.माझ्या माणसांना त्रास होऊ देणार नाही.आता संयम नाही. मी घरी बसणार नाही, मैदानात उतरणार, असे जाहीर करत पंकजा मुंडे यांनी प्रीतम ताई घरी बसतील तुम्ही लढा, असे चालणार नाही, असा थेट इशारा भाजपा पक्ष नेतृत्वाला दिला.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेली दसरा मेळाव्याची परंपरा कन्या माजी मंत्री पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी कायम ठेवली आहे. आज दसरा मेळाव्यास संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी समाजास भावनिक साद घातली. मुंडे म्हणाल्या, माझ्याकडे कोणतेही पद नसताना मी शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली.प्रत्येक ठिकाणी माझे जोरदार स्वागत झाले. शेवटचे पद हाती असताना लोकांसाठी अनेक काम केली. मी पराभूत झाले पण कधीच मनाने खचले नाही, तुमची सेवा करण्यात खंड पडला. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो, यामुळे तुमची हात जोडून माफी मागते.

महाराष्ट्रात आरक्षणाचे गंभीर प्रश्न, कोणताच समाज अपेक्षाभंग सहन करणार नाहीमाझ्या कारखान्यावर रेड झाली तेव्हा दोन दिवसांत तुम्ही कोट्यावधी रुपये जमा केले. मी एखादी निवडणूक हरले जरी तरी तुमच्या नजरेतून कधी उतरले नाही, माझ्याकडे तुम्हाला देण्यास काही नाही, अशी भावनिक साद मुंडे यांनी घातली. तसेच महाराष्ट्रात सध्या गंभीर प्रश्न आहेत, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मोठा आहे. अपेक्षाभंगाचे दु:ख सहन करण्याची सहनशक्ति आता कोणत्याच समाजात नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.शेतकरी सुखी नाही, पिकविमा मिळत नाही, उसतोड मजुरांना पैसा वाढवून द्या,अशा मागण्या देखील मुंडे यांनी केल्या.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीडBJPभाजपा