शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

परळीत वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 11:39 PM

परळी (जि. बीड ) : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी झाली आहे. ‘हर ...

परळी (जि. बीड) : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी झाली आहे. ‘हर हर महादेव’ च्या जयघोषात सकाळी दहा वाजेपर्यंत तीन लाख भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. वैद्यनाथाच्या दर्शनासाठी राज्य व परराज्यातून भाविक रविवारी रात्री बारा वाजल्या पासून मंदिरात आले. पहाटेपासून भाविकांच्या मंदिरात रांगा लागल्या. सकाळी नऊच्या नंतर गर्दीत वाढ झाली. सकाळी दहापर्यंत एक लाख भाविकांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले,अशी माहिती वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्र ेटरी राजेश देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली. दुष्काळी परिस्थिती, सुटी त्याचबरोबर सोमवारी महाशिवरात्र आल्याने भाविकांची गर्दी लोटली होती.महाशिवरात्रीनिमित्त सोमवारी सायंकाळी बीडचे जिल्हाधिकारी डॉ. आस्तिककुमार पांडेय यांच्या हस्ते प्रभू वैद्यनाथास ११ आवर्तनांचा रु द्राभिषेक करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा तहसीलदार डॉ. विपिन पाटील, सचिव राजेश देशमुख, प्रा.बाबासाहेब देशमुख, नंदकिशोर जाजू, प्रा.प्रदीप देशमुख, अनिलराव तांदळे, विजयकुमार मेनकुदळे, डॉ.गुरु प्रसाद देशपांडे, नागनाथराव देशमुख, रघुवीर देशमुख, शरद मोहरीर, यशवंत पुजारी आदी विश्वस्त उपस्थित होते. अभिषेकासाठी सायंकाळी ७ नंतर भाविकांची गर्दी झाली होती. ५ मार्च रोजी यज्ञेश्वर महाराज सेलूकर यांच्या उपस्थितीत श्रीसुक्त हवन होणार आहे. दुपारी दर्शन मंडपात महाप्रसाद होईल. ६ मार्च रोजी वैद्यनाथाची पालखी वैद्यनाथ मंदिरातून सवाद्य निघेल.

टॅग्स :BeedबीडMahashivratriमहाशिवरात्रीReligious programmeधार्मिक कार्यक्रम