वेळेवर रोहित्र देण्यास महावितरणकडून अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:30 AM2019-08-11T00:30:30+5:302019-08-11T00:31:02+5:30

महावितरचण्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यात अनेक गावात विजपुरवठा विस्कळीत झाला आहे. वडवणी तालुक्यातील ढोरवाडी गाव तर महिन्यापासून अंधारात आहे.

Prevention of Mahavirana on timely delivery of Rohitra | वेळेवर रोहित्र देण्यास महावितरणकडून अडवणूक

वेळेवर रोहित्र देण्यास महावितरणकडून अडवणूक

Next
ठळक मुद्देबीड  जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार । बीड ग्रामीणच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडून ग्राहकांची टाळाटाळ

बीड : महावितरचण्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यात अनेक गावात विजपुरवठा विस्कळीत झाला आहे. वडवणी तालुक्यातील ढोरवाडी गाव तर महिन्यापासून अंधारात आहे. त्यामुळे गावातील जनजिवन विस्कळीत झाले आहे. बीडच्या ग्रामीण उपअभियंत्याकडे मागणी केल्यावर ‘रोहित्र वेळेवर मिळत नसते...’ असे सांगून ग्राहकांची अडवणूक केली जात आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून महावितरणचा कारभार ढेपाळला आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने ग्राहकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रोहित्र जळाल्याने अनेक गावे अंधारात आहेत. याबाबत महावितरणच्या अधिकाºयांना विचारणा करायला गेल्यावर अभियंत्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहेत.
अशातच वडवणी तालुक्यातील ढोरवाडी गाव मागील महिनाभरपासून अंधारात आहे. याबाबत बीड ग्रामीणणे उपअभियंता सानप यांना विचारणा केली असता ‘रोहित्र वेळेवर मिळत नसते... आगोरचेच प्रस्ताव प्रलंबित आहेत’ असे सांगून हात झटकले जात आहेत. ग्राहकांना समाधानकारक उत्तरे न देता त्यांना टोलवाटोलवी करणाºया सानप सारख्या अधिकाºयांमुळे महावितरणबद्दल ग्राहकांमधून रोष व्यक्त होत आहे. सानप यांचा टोलवाटोलवी करण्याचा उद्देश काय, ग्राहकांची का अडवणूक केली जात आहे, याबाबत संशय व्यक्त होत असून त्यांच्या चौकशीची मागणी होत आहे.
४८ तासांत रोहित्र देण्याचा नियम
रोहित्र जळाल्यानंतर महावितरणने केवळ ४८ तासांत ते उपलब्ध करून देणे नियम आहे. मात्र, महावितरणचे अधिकारी आठवडा ते महिनाभर रोहित्रच उपलब्ध करून देत नसल्याचे समोर आले आहे. हे अधिकारी सर्व नियम ढाब्यावर बसवित आहेत.

Web Title: Prevention of Mahavirana on timely delivery of Rohitra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.