शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीच्या पार्श्वभूमिवर बीडमध्ये अडीचशे लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 16:39 IST

अडीचशे लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आल्याची माहिती बीड पोलिसांकडून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देजयंतीसाठी बीड पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त नियूक्त केला आहे.गोंंधळ घालणारे व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना नोटीसा

बीड : मंगळवारी छत्रपत्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या पार्श्वभूमिवर दंगा घालणाऱ्या व गुन्हेगारी पार्श्वभूमि असणाऱ्या तब्बल अडीचशे लोकांवर बीड पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही हा सोहळा पार पाडण्यासाठी नागरिकांनी नियोजन केले आहे. बीड शहरात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने दुपारी २ वाजता मिरवणूक काढली जाणार आहे. यासह जिल्हाभरात मिरवणुका काढण्यात येणार आहेत. यासाठी बीड पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त नियूक्त केला आहे. तसेच गतवर्षी गोंंधळ घालणारे व ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, अशांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या  आहेत. तसेच अडीचशे लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आल्याची माहिती बीड पोलिसांकडून देण्यात आली आहे.

असा असेल जिल्ह्यातील बंदोबस्तपोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोऱ्हाडे यांच्यासह ६ पोलीस उपअअधीक्षक,  १८  पोलीस निरीक्षक, ३३ सहायक पोलीस निरीक्षक, ६० पोलीस उपनिरीक्षक, १८१६ कर्मचारी, ४५० होमगार्ड,  राज्य राखीव दलाची तुकडी असा तगडा बंदोबस्त जिल्ह्यात असणार आहेत. तसेच ठिकठिकाणी फिक्स पॉर्इंट लावण्यात आले आहेत. यासह स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक, जिल्हा विशेष शाखा हे सुद्धा बंदोबस्तासाठी रस्त्यावर दिसणार आहेत. प्रत्येक हालचालीवर नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जाणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeed policeबीड पोलीसPoliceपोलिस