शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
5
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
7
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
8
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
9
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
10
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
11
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
12
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
13
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
14
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
15
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
17
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
18
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
19
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
20
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार

सासरच्या छळास कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:16 AM

पहिली मुलगी असल्याने दुसऱ्यांदा गर्भवती असलेल्या विवाहितेची सोनोग्राफी करून लिंगचाचणी करण्यासाठी दहा हजार रुपये आणि व्यवसायासाठी एक लाख रुपये माहेराहून घेऊन येण्याच्या मागणीसाठी तिचा सतत छळ करण्यात आला. या छळास कंटाळून त्या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना परळी शहरात शिवाजीनगर भागात सोमवारी उघडकीस आली.

ठळक मुद्देपरळीतील घटना : पतीसह पाच जणांवर गुन्हा; सोनोग्राफीसाठी दहा हजारांची केली होती मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : पहिली मुलगी असल्याने दुसऱ्यांदा गर्भवती असलेल्या विवाहितेची सोनोग्राफी करून लिंगचाचणी करण्यासाठी दहा हजार रुपये आणि व्यवसायासाठी एक लाख रुपये माहेराहून घेऊन येण्याच्या मागणीसाठी तिचा सतत छळ करण्यात आला. या छळास कंटाळून त्या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना परळी शहरात शिवाजीनगर भागात सोमवारी उघडकीस आली.मनीषा सुदर्शन घुगे (वय ३४, रा. शिवाजीनगर, परळी) असे त्या विवाहितेचे नाव आहे. मनिषाचे लग्न २०१२ साली सुदर्शन केशव घुगे याच्यासोबत झाले होते. त्यांना तीन वर्षाची एक मुलगी देखील आहे.लग्नानंतर काही दिवसातच सासरा केशव घुगे, सासू कुसुमबाई, पती सुदर्शन, दिर सदाशिव आणि जाऊ सुरेखा यांनी वेल्डिंगचे दुकान टाकण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये घेऊन ये, म्हणून छळ सुरु केला. तिला सतत उपाशी ठेऊन मारहाण करण्यात येऊ लागली. त्यातच पाच महिन्यापूर्वी मनीषा गर्भवती राहिली. परंतु, पहिली मुलगी आहे, आता दुसरी देखील मुलगीच आहे का, हे तपासण्यासाठी सोनोग्राफी करायची असून त्यासाठी माहेरहून १० हजार रुपये घेऊन ये, अशी मागणी करत मनीषाचा पुन्हा छळ सुरु झाला. पैसे घेऊन ये नाहीतर घराबाहेर जा म्हणून सासरचे लोक खूप मारहाण करत असल्याचे मनीषाने रविवारी दुपारी माहेरी फोन करून सांगतिले होते.यावेळी संक्रांत झाल्यावर पैश्याची सोय करू असा दिलासा तिला माहेरकडून देण्यात आला. मात्र, सोमवारी दुपारी ४ वाजता मनीषा दरवाजा उघडत नसल्याचे पतीने तिचे भाऊ हरिदास केशव मुंडे यांना फोनवरून कळविले. हरिदास यांनी चुलत भावासह मनीषाच्या घरी धाव घेऊन दरवाजा उघडून पहिले असता मनीषा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली असे हरिदास मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.याप्रकरणी मुंडे यांच्या फिर्यादीवरून पाचही आरोपींवर संभाजीनगर पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :BeedबीडSuicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारी