शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

प्रकल्प प्रेरणातील घोटाळा; चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती, दोन दिवसांत अहवाल देण्याचे सीएसचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 17:13 IST

Prakalp Prerana scam in Beed Civil Hospital : प्रकल्प प्रेरणा विभागाचे नोडल ऑफिसर डॉ.सुदाम माेगले यांनी न वापरलेल्या आणि खाजगी व्यक्तीच्या वाहनावर १४ लाख रूपये बील काढल्याची बाब लोकमतने १२ सप्टेंबर रोजी चव्हाट्यावर आणली होती.

ठळक मुद्देघोटाळेबाजांचे धाबे दणाणलेअहवालानंतर योग्य ती कारवाई

- सोमनाथ खताळ

बीड : जिल्हा रूग्णालयातील ( Beed Civil Hospital ) प्रकल्प प्रेरणा विभागातील १४ लाखांचा घोटाळा 'लोकमत'ने पुराव्यानिशी चव्हाट्यावर आणला होता. याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. चौकशी करून दोन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश डॉ.साबळे यांनी दिले आहेत. आता घोटाळेबाजांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. ( Prakalp Prerana scam in Beed; Three-member committee for inquiry, CS orders to report within two days) 

प्रकल्प प्रेरणा विभागाचे नोडल ऑफिसर डॉ.सुदाम माेगले यांनी न वापरलेल्या आणि खाजगी व्यक्तीच्या वाहनावर १४ लाख रूपये बील काढल्याची बाब लोकमतने १२ सप्टेंबर रोजी चव्हाट्यावर आणली होती. त्यानंतर याप्रकरणात आणखी खोलवर जावून माहिती घेतली असता प्रत्यक्षात वापरलेले वाहन हे १४ वर्षांपूर्वीचे आहे. नियमानुसार शासकीय वाहन ५ वर्षांपेक्षा जुने असू नये असा नियम आहे. परंतू एनएचएमचे लेखापाल संतोष चक्रे आणि डॉ.मोगले या दोघांनी मिळून शासनाची फसवणूक करत लाखो रूपयांचे बिले काढल्याचे उघड झाले होते. हा सर्व प्रकार लोकमतने चव्हाट्यावर आणताच जिल्हा शल्य चिकित्सकांनी याची गंभीर दखल घेत बुधवारी चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियूक्त केली. दोन दिवसांत चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश डॉ.साबळे यांनी दिले आहेत. आता यात डॉ.मोगले यांच्यासह आणखी किती लोकांचा सहभाग आहे, हे चौकशीनंतरच समोर येणार आहे.

हेही वाचा - बीडमधील प्रकल्प प्रेरणा घोटाळा; डॉ. मोगलेसह मते, कदम ‘मास्टर माईंड’

मैत्रि निभावणार की निपक्ष चौकशी होणार?चौकशीसाठी नियूक्त केलेल्या समितीतील दोन अधिकारी हे डॉ.मोगले यांच खास मित्र आहेत. आता त्यांच्याकडूनच चौकशी होणार असल्याने चौकशी निपक्ष होते की मित्राला बगल दिली जाते, हे दोन दिवसानंतर समजणार आहे. केवळ कागद काळे करून अहवाल देण्याचा प्रयत्न केल्यास समितीचीच चौकशी लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 'लोकमत'कडून याचा पाठपुरावा केला जाणार आहे.

अहवालानंतर योग्य ती कारवाई प्रकल्प प्रेरणा विभागातील प्रकार समजला आहे. याबाबत चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियूक्त केली आहे. दोन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले आहे. अहवाल मिळाल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.- डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड

हेही वाचा - 'अधिकाऱ्यांच्या मनमानीपणाचे उदाहरण',औरंगाबाद खंडपीठाकडून महावितरणला ५ लाख रुपये ‘कॉस्ट’

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडdoctorडॉक्टर