शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
3
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
4
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
5
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
6
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
7
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
8
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
9
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
11
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
12
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
13
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
14
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
15
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
16
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
17
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
18
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
19
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
20
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
Daily Top 2Weekly Top 5

परळीत वीज कर्मचारी, अधिकाऱ्यांचे ‘काम बंद आंदोलन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:37 IST

परळी : कोराेनाकाळात फ्रंटवर येऊन काम करत असलेले तिन्ही वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा ...

परळी : कोराेनाकाळात फ्रंटवर येऊन काम करत असलेले तिन्ही वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्यावा तसेच त्यांच्या कुटुंबांचे लसीकरण करावे, आदी मागण्यांसाठी सोमवारी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आणि परळी औष्णिक विद्युत केंद्रात वीज कर्मचारी, अधिकारी,अभियंता व कंत्राटी कामगारांनी काळ्या फीत लावून निषेध करत टूल डाऊन, पेन डाऊन आंदोलन केले.

शहरातील वीज वितरण कार्यालयात इंटकचे प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्युत कर्मचारी, अभियंता संयुक्त कृती समितीचे सुभाष मुंडे, दिगंबर तपासे, कृष्णा शिंदे, बळिराम गीते, कांतीलाल मुंडे, ज्ञानोबा मुंडे, मच्छिंद्र तारळकर, सचिन सूर्यवंशी, डी. आर. मुंडे, लक्ष्मण मुंडे, सुरेश देशमुख, प्रशांत खाडे, सुरेश खाडे, बिडगर, नागरगोजे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

सोमवारपासून येथील वीज वितरण कंपनीतील सर्वच कर्मचारी ‘काम बंद आंदोलन’ करत आहेत. वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात ऊर्जामंत्र्यांसोबत वीज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणे चालू आहे. तोडगा न निघाल्यास हे आंदोलन बेमुदत राहील.

- दत्तात्रय गुट्टे परळी प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक इंटक,

या आहेत मागण्या

वीज कामगार, अभियंते व अधिकारी तसेच कंत्राटी कामगारांना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन शासनाप्रमाणे सुविधा द्याव्यात. फ्रंटलाईन समजून वीज कामगार,अभियंते,अधिकारी व कंत्राटी कामगार,सर्व सहाय्यक,वीजसेवक व प्रशिक्षणार्थींचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे प्रथम लसीकरण करावे. कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्या वीज कामगारांना महाराष्ट्र शासनाप्रमाणे ५० लाख रुपये अनुदान द्यावे. तिन्ही कंपन्यांकरीता एम. डी. इंडिया या जुन्याच टीपीएची नेमणूक करावी. कोविडमुळे वीज बिल वसुलीकरीता सक्ती करू नये.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन,महाराष्ट्र वीज कामगार महासंघ,विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन,सबाॕर्डिनेट इंजिनियर असोसिएशन महाराष्ट्र राज्य, वीज तांत्रिक कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काॕँग्रेस-इंटक या संघटनेच्या निर्णयानुसार आंदोलन सुरू आहे. कोविड परिस्थितीमुळे वीज ग्राहकांना वेठीस न धरता हे ‘काम बंद आंदोलन’ चालू आहे. परळी विद्युत केंद्रातील ७०० कर्मचारी, अभियंता, कामगार सहभागी झाले आहेत. देवीदास देवकते, केंद्रीय कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना.

===Photopath===

240521\img-20210524-wa0266_14.jpg

===Caption===

परळी शहरातील वीज वितरण कार्यालयात इंटकचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी   आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्युत कर्मचारी ,अभियंता संयुक्त कृती समितीचे सुभाष मुंडे ,दिगंबर तपासे, कृष्णा शिंदे ,बळीराम गीते कांतिलाल मुंडे, ज्ञानोबा मुंडे आदी.