शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

मोबाईलवरून महिलेशी अश्लील संभाषण; विनयभंगाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:21 IST

शहरातील एका महिलेस मोबाईलवर कॉल करून अश्लील संभाषण केले आणि मेसेज पाठवून त्रास दिल्याप्रकरणी अज्ञातावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

अंबाजोगाई : शहरातील एका महिलेस मोबाईलवर कॉल करून अश्लील संभाषण केले आणि मेसेज पाठवून त्रास दिल्याप्रकरणी अज्ञातावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.पीडित महिला ही एका पतसंस्थेतील कर्मचारी आहे. बुधवारी त्या पतसंस्थेत दैनंदिन कामकाज करत असताना एका मोबाईल क्रमांकावरून त्यांना कॉल आला आणि तो व्यक्ती त्यांच्याशी संभाषण करण्याचा प्रयत्न करू लागला. या महिलेने चुकीचा क्रमांक असल्याचे सांगितल्यानंतरही त्या व्यक्तीने निरर्थक संभाषण सुरूच ठेवले. सायंकाळी पुन्हा त्या व्यक्तीने कॉल करून त्या महिलेस त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी ही बाब पती आणि दिराच्या कानावर घातली. त्यांनतर शुक्रवारी रात्री पुन्हा त्या व्यक्तीने फोन करून अश्लील संभाषण केले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत महिलेने अंबाजोगाई शहर ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञातावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरिक्षक कांबळे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :BeedबीडMobileमोबाइलMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी