शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा, जनतेत भीती; बीड जिल्ह्याचा होतोय का बिहार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 16:07 IST

विनोदाने बीडला बिहार म्हटले जात होते, परंतु आठवड्यापासून हा विनोद सत्यात उतरवू पाहत आहे.

- सोमनाथ खताळ

बीड : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात खून, दरोडे, लुटमार, धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्याचे प्रमुख आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालय आवारातच गोळीबाराची घटना घडली. या सर्व घटनांमुळे सामान्य जनता दहशतीखाली आहे. पोलिसांचा वचक कमी झाल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा झाले आहेत. विनोदाने बीडला बिहार म्हटले जात होते, परंतु आठवड्यापासून हा विनोद सत्यात उतरवू पाहत आहे. असे असतानाही बीड पोलीस आणि यंत्रणा सुधारण्याऐवजी आवाज उठविणाऱ्यांची मुस्कटदाबी करून गुन्हे दाखल करत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून कायदा व सुव्यवस्थाच हरवली आहे. खून, मारामारी, हल्ले, विनयभंग, बलात्कार, लुटमार अशा गंभीर घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच वाहतुकीचेही बारा वाजले आहेत. जिल्हादंडाधिकारी कार्यालयात गोळीबार होतो, पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर चाकूहल्ला होतो. गजबजलेल्या बसस्थानकासमोर भरदुपारी तरुणाचा खून हाेतो, यासारख्या अनेक घटनांनी जिल्हा हादरला आहे. परंतु मागील आठवड्यापासून तर एक दिवसाआड खून होत आहे. तसेच हल्लेही वाढले आहेत. या घटनांमुळे पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्यातरी बीडकरांसह जिल्हावासीय पोलीस यंत्रणेवर नाराज असून संताप व्यक्त करत असल्याचे दिसते. कायदा व सुव्यवस्थेवर सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडूनही ठोस आवाज उठविला जात नसल्याने त्यांच्याविरोधातही रोष आहे. आता यावर वेळीच उपाययोजना करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे गरजेचे आहे. जिल्हावासीयांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे आव्हान आता बीड पोलिसांसमोर आहे.

या घटनांनी हादरला जिल्हाबीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मुद्रांक कार्यालयातील भरदुपारी झालेला गोळीबार, परळीतील बहीण-भावाचा खून, परळीतच पैशाच्या व्यवहारातून महिलेचा खून, अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथील तीन चिमुकल्यांसह आईचा संशयास्पद मृत्यू, गेवराई व परळीत मृतदेहांचे सांगाडे आढळणे, आडसमध्ये काकाचा पुतण्यानेच केलेला खून, सिरसदेवीमध्ये झोपेतच दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला, बीडमध्ये बहिणीसह नियोजित वरावर भावाचा हल्ला, परळीत जुन्या रेल्वे स्थानकाजवळ युवकावर हल्ला, आष्टी तालुक्यातील वटाणवाडी येथे महिलेचा खून या गंभीर घटनांनी जिल्हा हादरला. एवढेच नव्हे तर परळीतील संभाजीनगर ठाण्यातील अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून झालेला अत्याचार, परळी ग्रामीण ठाण्यात अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार या सारख्या गंभीर व अंगावर थरकाप आणणाऱ्या घटनांचा हा लेखाजोखा आहे. यासह चोरी, अवैध वाळूउपसा, अवैध धंदे, शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या, मारामाऱ्या, शासकीय कामात अडथळा आदी गुन्ह्यांची संख्याही मोठी आहे.

एसपींविरोधात पोस्ट, जिल्हाध्यक्षांवर गुन्हाजिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आपचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यात त्यांनी पोलीस अधीक्षकांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. यावर सुधारणा करण्याऐवजी शिवाजीनगर पोलिसांनी येडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. कोणी आवाज उठविला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचे यावरून दिसत आहे. पोलिसांच्या विरोधात कोणी बोलायचेच नाही? असा काहीसा नियम पोलिसांनी लावल्याची चर्चा आहे. पोलिसांविरोधात बातम्या छापल्या तरी त्यांना नोटीस पाठविण्यासह गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिला जात असल्याची पत्रकारांमध्ये चर्चा आहे.

पंकजा मुंडेंनी उठविला आवाजजिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून याला सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केला होता. तसेच गृहमंत्र्यांनी बैठक घेण्याची मागणीही केली होती. परंतु यावर सत्ताधाऱ्यांनी ब्र शब्दही काढला नाही. या मुद्याला धरून राजकारण होत असले तरी वास्तवही आहे. याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे.

कोण काय म्हणतंय

ए राजा, खा राजा अन जा राजा असे अधिकाऱ्यांना वाटत आहे, पोलीस आरोपींशी संगनमत करतात, म्हणावा तसा तपास करीत नाहीत. आम्हाला अनेक प्रकरणात असे दिसले आहे. त्यामुळे आरोपी सुटतात आणि त्यांचे मनोबल वाढते. त्यामुळेच जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. सध्या तरी पोलीस प्रशासन जनतेच्या हिताचे काम करीत आहे.-  अॅड. अविनाश मंडले, बीड

राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. अधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे काम करू दिले नाहीत. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक हे रबरी स्टॅम्पप्रमाणे काम करीत आहेत. पोलीस प्रशासनाचा धाकच जाणवत नाही. वाळू माफिया, खून, हल्ले वाढल्याने भीती आहे. आपण महाराष्ट्रात आहोत की बिहारमध्ये हेच समजत नाही. पोलिसांकडून गुन्हेगारांना सोडून सामाजिक कार्यकर्त्यांवर मर्दानगी दाखविली जात आहे.- डॉ. गणेश ढवळे, सामाजिक कार्यकर्ते बीड

जैसा राजा तैसी प्रजा. एसपीसह प्रत्येकांचे नुसतेच विशेष पथके नियुक्त केलेत. एवढी मोठी यंत्रणा असताना रोज क्राईम घडत आहे. प्रमुखांचाच धाक नसल्याचे हे दिसत आहे. पोलिसांबद्दल लोकांच्या मनात जरबच राहिलेला नाही.- दिलीप खिस्ती, ज्येष्ठ पत्रकार बीड

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, असा प्रश्न आहे. इतर क्राईम तर वाढलेच आहे; परंतु महिला अत्याचाराचे प्रमाणही वाढत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे महिलांच्या मनात भीती आहे. त्या स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. दक्षता समितीच्या बैठकाही झाल्या नाहीत. महिलांच्या संरक्षण, नियोजनाबाबत काहीच केले जात नाही, हे दुर्दैव. - मनीषा तोकले, सामाजिक कार्यकर्त्या बीड

गेल्या काही दिवसांत घडलेल्या गुन्हेगारी घटना या वैयक्तिक स्वरुपाच्या आहेत. यातील कुठलेही प्रकरण प्रतिबंधात्मक कारवाईजोगे नव्हते. अचानक घडलेल्या या घटना असून, संबंधित ठाण्यांत गुन्हे नोंद झालेले आहेत. यावर योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू आहे.- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड