शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाकडून महिला दिनी महिलेवर अत्याचार; बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:21 IST

याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला असून पाेलिसांनी त्याला अटकही केली आहे.

पाटोदा : पोलिस ठाण्यात महिला दिनाचा कार्यक्रम आहे, त्यासाठी तू ये, असे म्हणून एका महिलेला बोलावले. नंतर तिला खोलीवर नेत मारहाण केली. त्यानंतर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार केला. ही घटना महिला दिनाच्या दिवशी पाटोदा शहरात घडली. याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला असून पाेलिसांनी त्याला अटकही केली आहे. एकीकडे महिलांचा सन्मान केला जात असताना दुसऱ्या बाजूला सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसानेच अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे.

उद्धव गडकर असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो मागील चार वर्षापासून पाटोदा पोलिस ठाण्यात कार्यरत होता. महिला दिनी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पाटोदा पोलिस ठाण्यात एक महिला आली. तुमच्याच कर्मचाऱ्याने माझ्यावर अत्याचार केला, अशी तक्रार तिची होती. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला. तिच्या आरोपानुसार मागील १५ दिवसांपूर्वी गडकर आणि पीडितेची ओळख झाली होती. शनिवारी सकाळी पीडिता ही पुण्याहून बीडला येत होती. यावर गडकर याने तिला महिला दिनाच्या अनुषंगाने कार्यक्रम आहे, त्यामुळे तू पाटोद्यात उतर असे सांगितले. त्यानंतर तेथून ते दोघे एका बँकेजवळील खोलीवर गेले. तेथे कोणीच नसल्याने पीडितेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने तिला कानाखाली मारली. तसेच ओरडली तर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत अत्याचार केला. त्यानंतर पोलिस कर्मचारी गडकर निघून पोलिस ठाण्यात आला. त्यानंतर पीडिताही दुपारी दीड वाजेच्या सुमारास ठाण्यात आली आणि फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा नोंद झाला. याचा तपास पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव हे करत आहेत.

अत्याचार करणाऱ्या पोलिसाला तीन दिवस कोठडीमहिला दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन पाटोदा पोलिस ठाण्यातील उद्धव गडकर या हवालदाराने २५ वर्षीय महिलेवर अत्याचार केला, तसेच तिला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचीही धमकी दिली होती. याप्रकरणी शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला होता. गडकर याला अटक करून रविवारी त्याला पाटोदा न्यायालयात हजर केले. यावेळी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पीडितेची पाटोदाऐवजी बीडला तपासणीया प्रकरणातील पीडितेची शनिवारी रात्री बीड जिल्हा रुग्णालयात आणून वैद्यकीय तपासणी करण्यात आली; परंतु पाटोद्यात ग्रामीण रुग्णालय आणि सर्व वैद्यकीय तज्ज्ञ असतानाही बीडला का नेले? असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत पाटोद्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिषेक जाधव म्हणाले, शनिवारी ग्रामीण रुग्णालयात पुरुष वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. महिला वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे कदाचित बीड येथे रेफर करण्यात आले असेल; पण बीड येथे पाटोदा ग्रामीण रुग्णालयातीलच वैद्यकीय अधिकारी डॉ. तांदळे यांनी महिलेची तपासणी केली, असे सांगितले.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला