शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांना पोलिसांचे अभय; बँक मॅनेजरला कॅबिनमध्ये घुसून मारहाण करणारे आरोपी मोकाटच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 17:55 IST

मारहाण करणारे वडवणीच्या माजी नगराध्यक्षाचा मुलगा आणि भाजप कार्यकर्ता धनराज मुंडे व अरूण मुंडे हे दोघेही पाच दिवसानंतरही मोकाटच आहेत.

बीड : कर्ज प्रकरणाच्या फाईलमध्ये त्रूटी काढल्याने वडवणी येथील एसबीआय बँकेच्या मॅनेजरला कक्षात घुसून मारहाण करणारे वडवणीच्या माजी नगराध्यक्षाचा मुलगा आणि भाजप कार्यकर्ता धनराज मुंडे व अरूण मुंडे हे दोघेही पाच दिवसानंतरही मोकाटच आहेत. त्यांच्या अटकेसाठी बीडमध्ये बँक कर्मचाऱ्यांनी मोर्चाही काढला होता, परंतू वडवणी पोलिसांनी सत्ताधारी पक्षाचा असल्याने त्यांना अभय देण्याचा प्रकार केला आहे. सामान्यांना खाकीचा धाक दाखविणारे पोलिस सत्ताधाऱ्यांना अटक करत नसल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या प्रकरणातून समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होऊन विश्वास कमी हाेत चालला आहे.

वडवणी येथील एसबीआय बँकेचे शाखा प्रबंधक युवराज पाटील यांना मारहाण केल्याची घटना २४ जून रोजी घडली होती. याप्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात भाजप कार्यकर्ता धनराज राजेभाऊ मुंडे आणि त्यांचा सहकारी अरूण मुंडे यांच्यावर वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर २७ जून रोजी या दोघांना अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व बँकिंग अधिकारी व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. तरीही वडवणी पोलिसांनी या दोघांना अटक केलेली नाही. त्यामुळे कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना कक्षात घुसून शिवीगाळ केल्याप्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यातही अटक झाली नव्हती. ही घटना ११ मे २०२३ रोजी घडली होती. 

बँक कर्मचारी कामबंदच्या तयारीतधनराज मुंडे व अरूण मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांच्या अटकेसाठी मोर्चा काढूनही वडवणी पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करत आरोपींना अटक केली नाही. त्यामुळे संतापलेले बँक कर्मचारी आता कामबंद करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पोलिसांनी वेळीच लक्ष देऊन आरोपींना अटक करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. दरम्यान, याबाबत वडवणीचे सहायक पाेलिस निरीक्षक अमन सिरसाट यांना फोनवरून संपर्क केला. परंतू त्यांचा फोन न लागल्याने बाजू समजली नाही.

चौकशी करूमी स्वत: या प्रकरणात लक्ष घालून आहे. आरोपी कोणीही असो, आम्ही त्याला अटक करणारच आहोत. आमचे प्रयत्न सुरूच आहे. काही चुकीचे प्रकार घडतात, हे ऐकून वाईट वाटते. आमचेही पोलिस जर पाठिशी घालत असतील तर चौकशी करू.- धीरजकुमार बच्चू, सहायक पोलिस अधीक्षक माजलगाव

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडBJPभाजपा