शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कडक IPS अधिकाऱ्याच्या नावाचा गैरफायदा; वाळू माफियांकडून वसुली करणारा अंमलदार निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 12:47 IST

राजकीय पक्षांच्या आश्रयाला असलेल्या पदाधिकाऱ्यांसह अवैध धंदेवाले व माफियांविरुद्ध धडक कारवाया केल्याने पंकज कुमावतांच्या नावाची दहशत आहे. याचाच फायदा घेत अंमलदार धोंडीराम मोरे यांनी परस्पर वसुलीचा फंडा वापरला.

बीड : वरिष्ठांच्या परवानगीशिवाय वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची परस्पर रॉयल्टी तपासून वसुली करणाऱ्या अंमलदारास ९ ऑगस्ट रोजी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. त्याच्या कारनाम्याचा खुद्द पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनीच पर्दाफाश केला. दरम्यान, या कारवाईने हप्तेखाेरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

धोंडीराम मोरे असे या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. ते माजलगाव ग्रामीण ठाण्यात कार्यरत असून तेथील उपअधीक्षक कार्यालयात संलग्न आहेत. उपअधीक्षक पद रिक्त असल्याने सध्या अतिरिक्त पदभार केजचे सहायक अधीक्षक व आयपीएस पंकज कुमावत यांच्याकडे आहे. अवैध धंद्यांवर कारवाईसाठी कुमावतांनी नेमलेल्या पथकासाठीही मोरे काम करत. याचा फायदा घेत ते माजलगाव ग्रामीण ठाणे हद्दीत वाळू वाहनांची परस्पर तपासणी करत. रॉयल्टी तपासणीच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार करत, अशा स्वरूपाच्या तक्रारी अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना प्राप्त झाल्या होत्या. 

दरम्यान, ९ ऑगस्ट रोजी खुद्द अधीक्षकांनीच खातरजमा करण्यासाठी अंमलदार धोंडीराम मोरे यांना मोबाइलवरून वाळू वाहनांची तपासणी सुरू आहे का, असे विचारले. त्यावर मोरे यांनी हो म्हटले. मात्र, याबाबत कोणाचे आदेश आहेत, पंकज कुमावत यांनी सांगितले होते का, अशी विचारणा केल्यानंतर मोरे गडबडले. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराच्या उद्देशाने परस्पर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची रॉयल्टी तपासणी करून गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवून अधीक्षक ठाकूर यांनी त्यांना निलंबित केले.

कुमावत यांच्या दहशतीचा असाही गैरफायदा....राजकीय पक्षांच्या आश्रयाला असलेल्या पदाधिकाऱ्यांसह अवैध धंदेवाले व माफियांविरुद्ध धडक कारवाया केल्याने पंकज कुमावतांच्या नावाची दहशत आहे. याचाच फायदा घेत अंमलदार धोंडीराम मोरे यांनी परस्पर वसुलीचा फंडा वापरला. कुमावत यांच्या नावाखाली अवैध धंदेवाल्यांशी हितसंबंध ठेवणारे यामुळे रडारवर आले आहेत.

वरिष्ठांच्या आदेशाशिवाय करत होता तपासणीसंबंधित अंमलदार पंकज कुमावत यांच्या पथकात असल्याचे सांगून वरिष्ठांच्या आदेशाशिवाय वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची रॉयल्टी तपासत असल्याची माहिती होती. उलटतपासणी म्हणून मीच त्यास कॉल करून माहिती घेतली तेव्हा तो परस्पर तपासणी करत असल्याचे आढळले. त्यामुळे त्यास निलंबित केले.- नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक, बीड 

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी