शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संदल मिरवणुकीत कर्तव्य बजावताना पोलीस अंमलदाराचा मृत्यू

By संजय तिपाले | Updated: September 29, 2022 23:46 IST

शेख अन्वर शेख अब्दुल रउफ (वय ३५) असे त्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे.

बीड: शहरातील प्रसिद्ध शहेंशाहवली दर्गा उरूसनिमित्त निघालेल्या संदल मिरवणुकीत बंदोबस्तावर असलेल्या एका पोलीस अंमलदाराचा मृत्यू झाला. अचानक अस्वस्थ वाटल्याने त्यांना खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ही हृदयद्रावक घटना २९ सप्टेंबर रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली. शेख अन्वर शेख अब्दुल रउफ (वय ३५) असे त्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. २०१२ मध्ये पोलीस दलात अंमलदार म्हणून भरती झालेले शेख अन्वर यांनी वाहतूक शाखा, स्थानिक गुन्हे शाखेत कर्तव्य बजावले. सध्या ते दंगल नियंत्रण पथकात कार्यरत होते. पेठ बीड हद्दीत २९ सप्टेंबर रोजी पारंपरिक पद्धतीने शहेंशाहवली दर्गा उरूसनिमित्त निघालेल्या संदल मिरवणूक निघाली होती. यावेळी दंगल नियंत्रण पथकाचे जवान तैनात करण्यात आले होते. यात शेख अन्वर यांचाही समावेश होता. 

डीजेच्या दणदणाटासह निघालेली मिरवणूक रात्री ८ वाजता शहेंशाहवली दर्गा परिसरात आली. यावेळी अचानक शेख अन्वर यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना सहकाऱ्यांनी तातडीने जालना रोडवरील एका खासगी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले; पण त्यांना वाचविण्यात यश आले नाही. हृदयविकाराच्या धक्क्याने शेख अन्वर यांचा मृत्यू झाल्याचचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.  

खासगी दवाखान्यात उपअधीक्षक संतोष वाळके, पेठ बीडचे पो. नि. हेमंत कदम यांनी धाव घेतली. शेख अन्वर यांचे वडील देखील पोलीस दलात होते. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर ३० सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता शहेंशाहवली दर्गा परिसरातील कब्रस्थानमध्ये दफनविधी करण्यात येणार आहे.

सहकाऱ्यांना अश्रू अनावर, मित्रपरिवार हळहळलादरम्यान, कर्तव्यावर असताना शेख अन्वर यांचा मृत्यू झाल्याने सहकाऱ्यांना अश्रू अनावर झाले. संदल कार्यक्रमात सहभागी नागरिक देखील हळहळले. त्यांच्या कुटुंबासह मित्रांनाही या बातमीने धक्का बसला. दवाखान्यात मोठी गर्दी झाली होती.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिस