शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांचे वैरण नेत्यांनी खावू नये असे छावणीचे नियोजन करणार : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 17:42 IST

छावणीचा उपयोग पशुधनाला व्हावा. पुर्वीप्रमाणे वैरण नेत्यांनी खावू नये या दृष्टीने नियोजन करु

बीड : दुष्काळजन्य स्थितीमध्ये जनावरं जगली पाहिजे त्यामुळे मागणीप्रमाणे चारा छावणी व्यवस्थेत बदल केला जाईल.  परंतु छावणीचा उपयोग पशुधनाला व्हावा. पुर्वीप्रमाणे वैरण नेत्यांनी खावू नये या दृष्टीने नियोजन करु, योग्य ठिंकाणी पाहिजे त्या प्रमाणात छावणी सुरु करण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

बीड येथे नगर पालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री पंकजा मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. सुरेश धस, आ. विक्रम काळे, आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मराठवाड्याचा भाग दुष्काळाने होरपळला आहे. एक वर्ष सोडले तर सातत्याने समाना करावा लागतोय. दुष्काळमुक्तीसाठी जलयुक्त शिवार योजना उपयुक्त ठरली. आतापर्यंत दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक मर्च- एप्रिलमध्ये यायचे, दुष्काळाचे अनुदान मे- जूनमध्ये मिळायचे. यंदा दुष्काळाची तीव्रता पाहून आम्ही ३१ आॅक्टोबरला दुष्काळ जाहीर केला. ६०० कोटींचे अुनदान दिले. त्यापैकी १५६ कोटी वर्ग केले. ही रक्कम प्रशासनाच्या खात्यात अथवा बॅँकेत ठेवू नका, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा असे संबंधित यंत्रणेला निर्देश दिल्याचे सांगून येत्या १५ मार्चपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. 

बेघरांना घर देण्यास सरकार कटीबद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा संकल्प केला आहे. राज्य सरकारनेही  आतापर्यंत ५ लाख घरे पूर्ण केली, ५ लाख घरे करत आहोत. हे काम कधीच झाले नाही. सरकार बेघरांना घरे देण्यासाठी कटीबध्द असून बीडमध्ये जेवढ्या घरांची मागणी असेल ती मंजूर करु अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. अतिक्रमणे नियमित करत असून ३ लाख अतिक्रमणे नियमित केल्याचे सांगून १० लाख अतिक्रमणे नियमित करण्यात येतील असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

पहा व्हिडिओ :

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीdroughtदुष्काळState Governmentराज्य सरकार