शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

दिंडी मार्गावर तिहेरी अपघातात दोघे ठार, १५ गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 16:22 IST

मृत आणि जखमी सेलू ( जि परभणी) येथील रहिवासी असून पंढरपूरहून गावी परतत असल्याची माहिती आहे. 

- पुरुषोत्तम करवामाजलगाव ( बीड) : पंढरपूरच्या एकादशी यात्रेहून परत येणाऱ्या पिकअप टेम्पो ( क्र. एम एच १६-ये वाय-२६०२ ), ट्रॅक्टर व मोटरसायकल ( क्र एम एच ४४आर ७९३६) सोबत तिहेरी अपघात होऊन दोघे जागीच ठार झाले. हा अपघात आज दुपारी ४ शेगाव -पंढपूर या दिंडी मार्गावरील नित्रुडजवळ झाला. नारायण ताठे ( रा.माले टाकळी ता.सेलू ) व केशव चंद्रभान डाके ( ४२ रा.डाके पिंपरी ता.माजलगाव ) अशी मृतांची नावे आहेत. तर अपघातात पंधरा जण जखमी झाले असून त्यातील पाच जण गंभीर आहेत. 

कोरोना काळानंतर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुले झाल्याने राज्यभरातील भाविकांनी दर्शनासाठी तिकडे धाव घेतली. मंगळवारी एकादशी असल्याने परभणी जिल्ह्यातील  २३ भाविक पिकअप टेम्पो मधून पंढरपूरला गेले होते. बुधवारी परत येत असताना तेलगाव-माजलगाव दरम्यान असलेल्या नित्रुड टालेवाडीच्या पुलावर पिकअप टेम्पो, ट्रॅक्टर आणि दुचाकी असा तिहेरी अपघात झाला. त्यामध्ये मोटर सायकलवरील केशव डाके व टेम्पोमधील नारायण ताठे हे दोघे ठार झाले. 

अपघातात टेम्पोमधील इतर भाविक जखमी झाले आहेत. दरम्यान, श्रीपती धोंडीराम हूरसुने, पंडित शेषराव ताठे,रा. माली टाकळी तालुका सेलू, श्रीहरी आश्रुबा उगले सिमुरगव्हाण तालुका सेलू,साधू देवराव हेंडगे राहणार करंजी तालुका मानवत, शिवाजी भागूजी वायकर रा. राजे धामणगाव तालुका सेलू हे गंभीर जखमी आहेत. त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

तर युवराज गणेश कृष्णे हा नऊ वर्षाचा मुलगा राहणार राजे धामणगाव , बाबुराव जनार्दन उगले सिमुरगव्हाण, विश्वनाथ श्रीरंग मगर, 65 राहणार खवणे पिंपरी, तालुका सेलू ,पुंजाराम महादेव राऊत 45, राजाराम सखाराम पिंगळकर राहणार धामणगाव तालुका सेलू यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुभाष बडे, डॉ.गजानन रुद्रवार, डॉ. चंदाराणी नरवडे, डॉ. परिक्षित हेलवाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार केले.

यावेळी अपघाताची माहिती समजताच  निञुड येथील गोपाळ कुलकर्णी, शेख आतिक, द्ता गिराम, रामदिप डाके, अजित डाके आदी ग्रामस्थांनी अपघातातील लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून मदत केली. तर अपघात होऊन एक तासापेक्षा जास्त कालावधी होऊन ही दिंद्रुड पोलीस घटनास्थळी दाखल झाले नव्हते.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू