शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांचा पिकअप बुडाला अन् ओढ्याला नोटांचा पूर; दोघे बचावले, एक बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 19:56 IST

गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होत आहे. नद्या, नाले, ओढयांना पूर आला आहे.

दिंद्रुड (बीड): सिरसाळा - मोहा रस्त्यावरील एका ओढ्यात पिकअपसह तिघे तरुण बुडाल्याची घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.  दरम्यान, दोघांना वाचविण्यात यश आले आहे. तर एकजण अद्यापही बेपत्ता आहे. रईस अन्सर आत्तार असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. दोघे व्यापारी असून फटाके माल आणण्यासाठी पिकअप घेऊन निघाल्याची माहिती आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होत आहे. नद्या, नाले, ओढयांना पूर आला आहे. दरम्यान, आज दुपारी शेख रईस अन्सर अत्तार, शेख अखिल अत्तार, व दिपक चोरघडे हे तिघे दिंद्रुडहून पिकअपमधून अंबाजोगाईकडे निघाले. सिरसाळा ते कान्नापूर- मोहा  रस्त्यावरील गव्हाडा या ओढ्याला पुर आला आहे. चालकाला पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पिकअप ओढ्यात बुडाला. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने गाडीसह तिघे तरुण ओढ्यात शंभर फुटांपर्यंत वाहून गेले. 

गाडी ओढ्यात बुडाल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थ बचावकार्यासाठी धावले. शेख अखिल आत्तार व दीपक चोरघडे या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र शेख रईस अन्सर अत्तार ( 35 वर्ष) अद्याप बेपत्ता आहे. पडता पाऊस व पुरामुळे शोध कार्यास अडथळा येत आहे. ओढा घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावरील मुंगी-सुकळी तलावास मिळतो. तेथे सायंकाळी ७ वाजेपर्यंत शोधकार्य केले असताही तरूण सापडला नाही. दरम्यान, उद्या सकाळी परळी येथील फायर ब्रिगेडचे पथक शोधकार्य करेल अशी माहिती, धारूरचे तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी दिली आहे. 

ओढ्यात नोटांचा खच शेख अखिल अत्तार आणि शेख रईस अन्सर अत्तार हे नातेवाईक आहेत. ते दोघे व्यापारी असून फटाक्यांचा माल भरण्यासाठी  दीपक चोरघडेचे पिकअप घेऊन अंबाजोगाईकडे निघाले होते. गाडीसह तिघेही बुडत काही अंतरावर वाहत गेले. या व्यापाऱ्यांकडे फटाके खरेदीसाठीची मोठी रक्कम होती. ती ओढ्यात सर्वत्र पसरली होती. ओढ्याच्या जवळच असलेल्या  मुंगी-सुकळी तलावात देखील नोटांचा खच पाहण्यास मिळाला.

टॅग्स :RainपाऊसBeedबीड