शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पीआय खाडेंमुळे साईड पोस्ट बनली क्रीम पोस्ट; आर्थिक गुन्हे शाखेचा नवा कारभारी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 15:42 IST

बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडेच्या घराची झडती घेतली असता १ कोटी ८ लाखांची रोकड, एक किलाे सोने, साडे पाच किलो चांदी असे घबाड सापडले.

बीड : आर्थिक गुन्हे शाखेची पोलिस निरीक्षक ही पोस्ट साईड पोस्ट समजली जाते. हा अलिखित नियमच आहे. परंतू पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे याने ही पोस्ट साईड नसून क्रीम असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. खाडेचे निलंबन झाल्याने ही जागा आता रिक्त झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणाची वर्णी लागणार? याकडे लक्ष लागले आहे. 

जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एक कोटी रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहायक फौजदार आर.बी.जाधवर आणि खासगी इसम कुशल जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बीडच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खाडेच्या घराची झडती घेतली असता १ कोटी ८ लाखांची रोकड, एक किलाे सोने, साडे पाच किलो चांदी असे घबाड सापडले. यासोबतच जाधवरच्या घरातही पावकिलो सोने सापडले होते. अद्यापही हे दोघे फरारच आहेत. दरम्यान, कारवाई नंतर लगेच पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी खाडे आणि जाधवरचे निलंबण केले. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेची जागा रिकामी झाली आहे. या जागी आता नवा अधिकारी कोण येणार? याकडे लक्ष लागणार आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, याच शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब आघाव यांनी या शाखेसाठी प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला तक्रारी नसलेले सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास गात यांच्या नावाचीही चर्चा आहे. गात यांच्याकडे अनुभव असल्याने आणि प्रतिमा स्वच्छ असल्याने त्यांच्याकडे पदभार देण्याची मागणी ठेविदारांकडून केली जात आहे. परंतू पोलिस अधीक्षक ठेविदारांच्या मागणीचा विचार करतात की दुर्लक्ष, हे वेळच ठरवेल. 

ठेविदारांचा एसपींवरही आरोपखाडेवर कारवाई झाल्यानंतर जिजाऊच्या ठेविदारांनी खाडेवर तर आरोप केलेच, परंतू त्याला पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचेच पाठबळ असल्याचा आरोपही केला होता. तसेच या प्रकरणाची फेर चौकशी करण्याची मागणीही केली होती. आतापर्यंत तरी ठेविदारांवर आर्थिक गुन्हे शाखेने न्याय दिलेला नाही. आता तरी चांगला अधिकारी देऊन न्याय देतील का? याकडे लक्ष लागले आहे. 

पोलिस अधीक्षक बैठकीतआर्थिक गुन्हे शाखेच्या पदभाराबात पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना संपर्क केला. परंतू त्यांनी आपण बैठकीत असल्याचे सांगितले. त्यामुळे फारसे बाेलता आले नाही. तर अपर अधीक्षक सचिन पांडकर यांनीही फोन घेतला नाही. त्यामुळे बाजू समजली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBeedबीड