शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चुलत भावाच्या सरपंचपदाच्या प्रचारार्थ मुंडे बंधू-भगिनीचे फोटो एकाच बॅनरवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 19:06 IST

ग्रामपंचायतवर दोन टर्मपासून माजीमंत्री धनंजय मुंडे यांचे वर्चस्व 

- संजय खाकरेपरळी ( बीड) : तालुक्यातील नाथरा ग्रामपंचायतच्या सरपंचपदाची १८ डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून या निवडणुकीसाठी सरपंचपदाचे उमेदवार अभय माणिकराव मुंडे हे आहेत. त्यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे तसेच माजी मंत्री भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे समर्थक कार्यकर्ते एकत्र आले आहेत. मुंडे बंधू -भगिनीचा फोटो एकाच बॅनरवर झळकला असून सोशल मीडियावर याचा फोटो व्हायरल  झाला आहे.

नाथरा हे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे गाव आहे. सध्या गावात माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि माजी मंत्री भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे सक्रीय राजकारणात आहेत. यामुळे येथील ग्रामपंचायत निवडणुकीस विशेष महत्व आहे. नाथऱ्यातील प्रभाग क्रमांक एक, व तीन या दोन प्रभागातील अनुक्रमे तीन, तीन सदस्य, वॉर्ड क्रमांक 2 मधील 2 सदस्य असे मिळून 8 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघांचेही समर्थक असल्याचे सांगण्यात येते. 

दरम्यान, सरपंचपदासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. यात मुंडे बहिण भावांचे चुलत भाऊ अभय मुंडे यांचा देखील समावेश आहे. तर प्रभाग 2 मधील एका जागेसाठी गीता प्रकाश मुंडे व दिव्या अंगद मुंडे या उभ्या आहेत. या दोन्ही जागेसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. प्रचाराचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी नाथऱ्यात माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे तसेच माजी मंत्री भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे फोटो एकाच  बॅनरवर झळकले आहेत. दोघांचे समर्थक अभय मुंडे यांच्यासाठी एकत्र येत असल्याचे चित्र आहे. 

ग्रामपंचायतवर दोन टर्मपासून धनंजय मुंडे यांचे वर्चस्व गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नाथरा ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यात आली होती,तेव्हा  बीड जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांच्या मातोश्री या सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यापूर्वी अजय मुंडे हे सरपंच झाले होते. आता त्यांचे बंधू अभय मुंडे हे सरपंचपदाचे उमेदवार आहेत. पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांचे ते चुलत बंधू आहेत. मागील दोन टर्मपासून नाथरा ग्रामपंचायत राष्ट्वादीचे आ. धनंजय मुंडे यांच्या ताब्यात  आहे.

टॅग्स :BeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेgram panchayatग्राम पंचायत