शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

केरळहून प्रशिक्षण घेऊन बीड, जालन्यात घेतले PFI कॅम्प; एटीएस उलगडतेय फैजलचे नेटवर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 12:22 IST

पीएफआयच्या वतीने बीडसह जालना येथे ठराविक व्यक्तींना बंद शेडमध्ये शारीरिक प्रशिक्षण दिल्याचा आरोप

बीड : एनआयए व एटीएसच्या रडारवर असलेल्या पीएफआयच्या (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) औरंगाबादेतील पाच संशयित पदाधिकाऱ्यांपैकी सय्यद फैजल सय्यद खलील (वय २८ ) याचे बीड कनेक्शन समोर आले आहे. पीएफआयच्या वतीने बीडसह जालना येथे ठराविक व्यक्तींना बंद शेडमध्ये शारीरिक प्रशिक्षण दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यामुळे बीड पुन्हा चर्चेत आले आहे.

देशविरोधी कटकारस्थान रचल्याच्या संशयावरून एनआयए, एटीएसने २२ सप्टेंबर रोजी पहाटे देशभर छापे टाकले होते. यात नाशिक येथील दहशतवादविरोधी पथकाने पीएफआयचा माजी जिल्हाध्यक्ष वसीम अजीज शेख (३०, रा. जुनाबाजार, बीड) यास उचलले होते. इकडे औरंगाबादच्या दहशतवादविरोधी पथकाने औरंगाबादेतून चार व जालना येथून एक अशा पाच कार्यकर्त्यांना अटक केली होती. २ ऑक्टोबर रोजी या पाच संशयितांच्या कोठडीत ४ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली.

यापैकी औरंगाबादेतील रोजेबाग परिसरातील रहिवासी सय्यद फैजल सय्यद खलील याने केरळमधून प्रशिक्षण घेतलेले असून पीएफआयतर्फे तो बीड व जालना येथे बंद शेडमध्ये मोजक्या व्यक्तींना प्रशिक्षण देत असल्याने एटीएस पथकाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे बीड पुन्हा एकदा एनआयए व एटीएसच्या नजरेत आले आहे. फैजलने किती जणांना प्रशिक्षण दिले, प्रशिक्षण कशा प्रकारचे होेते, या बाबी चौकशीतच उघड होणार आहेत.

एटीएसने मागवला बॅंक खात्यांचा तपशीलपीएफआयचा माजी जिल्हाध्यक्ष वसीम अजीज शेख याच्या बँक खात्यांचा तपशील मागविल्याची माहिती सूत्रांनी दिली. वसीम शेख सध्या नाशिक एटीएसच्या ताब्यात असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. त्याच्या बँक खात्यातून काही संशयास्पद व्यवहार झाले आहेत का, हे चौकशीनंतरच समोर येणार आहे.

दोन पदाधिकाऱ्यांची जामिनावर सुटका२७ सप्टेंबर रोजी पहाटे पीएफआय जिल्हाध्यक्ष फेरोज मोमीन (३६, रा. कागदीवेस, बीड) व जिल्हा कार्यकारिणी सदस्य कामरान खान मोहब्बत खान (३५,रा. जुना बाजार, बीड) या दोघांना स्थानिक पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले. कलम १५१ (३) नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना न्यायालयात हजर केले होते. त्यांना ३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ३ ऑक्टोबर रोजी जिल्हा कारागृहातून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेमार्फत त्यांच्यावर कलम १०७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

काहीजणांवर नजर आहे पीएफआयसंबंधी एनआयएकडून तपास सुरू आहे. त्यांना तपासकामी आवश्यक ते सहकार्य करण्याचे काम जिल्हा पोलीस दल करत आहे. दोन पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे. त्यांच्यावर पोलीस वॉच ठेवून आहेत.- नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक, बीड 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड