शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

पेठ बीडमध्ये महिलेचा बतईने चिरला गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:09 AM

पती भिक्षा मागायला बाहेर गेला होता. हीच संधी साधून अज्ञात आरोपीने घरात प्रवेश करीत ४७ वर्षीय महिलेचा भाजी कापायच्या बतईने गळा चिरून खून केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पती भिक्षा मागायला बाहेर गेला होता. हीच संधी साधून अज्ञात आरोपीने घरात प्रवेश करीत ४७ वर्षीय महिलेचा भाजी कापायच्या बतईने गळा चिरून खून केला. ही घटना बीड शहरातील पेठबीड भागातील आयोध्यानगर भागात शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. हत्येनंतर संबंधित आरोपीने रक्ताने माखलेली बतई बाजूलाच असणाऱ्या एका विहिरीत टाकून पळ काढला. याप्रकरणी शेजारीच राहणाºया अशोक जंगले नामक व्यक्तीवर पेठबीड पोलीस ठाण्यत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.शिलावती किसन गिरी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. शिलावती या आपल्या पतीसह घरी राहतात. त्यांना मुलबाळ नसल्याने त्यांनी आपल्या बहिणीचा मुलगा विक्रम यास दत्तक घेतले होते. त्याचे लग्न झाले असून तो सध्या उसतोडण्यासाठी बाहेर जिल्ह्यात गेलेला आहे. त्यामुळे घरात शिलावती आणि पती किसन हे दोघेच राहत होते. शनिवारी सकाळीच किसन गिरी हे भिक्षा मागण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यामुळे शिलावती या घरात एकट्याच होत्या. हीच संधी साधून आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश केला. किचन रूममध्ये जावून तेथीलच भाजी कापायच्या बतईने त्यांचा गळा चिरून खून केला. त्यानंतर आरोपी बिनधास्तपणे बाहेर आला. हातात रक्ताने माखलेली बतई त्याने बाजूच्याच विहिरीत टाकली व नंतर पसार झाला. पोलिसांनी तात्काळ तपासासाठी पथके पाठविले आहेत.खुनाचे कारण अद्यापही अस्पष्टघटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोनि बाळासाहेब बडे, उपनिरीक्षक कैलास लहाने यांनी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रूग्णालयात पाठविला. पोलिसांनी गुन्ह्यातील हत्यार आणि इतर पुरावे जप्त केले आहेत. उशिरापर्यंत खुनाचे कारण समजू शकले नव्हते.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसMurderखूनWomenमहिला