शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

रबी हंगामातील पेरा दोन टक्के; धान्याचा तुटवडा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:38 IST

यंदा पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. खरीप हंगामासह रबीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात रबीचे क्षेत्र जवळपास ३ लाख १० हजार हेक्टर आहे. परंतु, त्यापैकी फक्त दोन टक्के क्षेत्रावर पेरा झाला आहे. तसेच ज्वारी, गहू पिकांची पेरणी कमी झाल्याने चारा व धान्यांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिलकडबा कमी झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न होणार गंभीर३ लाख हक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणीच नाही

प्रभात बुडूखबीड : यंदा पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. खरीप हंगामासह रबीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात रबीचे क्षेत्र जवळपास ३ लाख १० हजार हेक्टर आहे. परंतु, त्यापैकी फक्त दोन टक्के क्षेत्रावर पेरा झाला आहे. तसेच ज्वारी, गहू पिकांची पेरणी कमी झाल्याने चारा व धान्यांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे.यावर्षी सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे, जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीच्या काळात झालेल्या थोड्याफार पावसावर खरिप हंगामात जवळपास ६ लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांचा पेरा झाला होता. पेरणीनंतर मात्र पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे कापूस, उडीद, मूग यासह इतर खरिप पिकांचा उतारा अतिशय कमी आला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.जिल्ह्यातील रबी हंगामाचे पेरणी क्षेत्र ३ लाख १० हजार हेक्टर आहे. त्यापैकी फक्त ६ हजार ३३२ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांचा पेरा झाला आहे. गेल्या वर्षी रबी हंगामात सरासरीच्या तुलनेत ११० टक्क्यापेक्षा अधिक पेरणी झाली होती. मात्र, यावर्षी राज्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकºयांवर मोठे संकट कोसळले आहे. रब्बी हंगामात ज्वारीचा पेरा सर्वाधिक असतो. सोबत गहू, हरभरा, मका, करडई ही पिके देखील घेतली जातात. मात्र, यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसामुळे अनेक पिकांची पेरणीच झाली नाही. पेरणी अहवाल शासनाकडे पाठविल्याचे कृषी अधीक्षक एम. एल. चपळे यांनी सांगितले.पेरा कमी झाल्याने चा-याचे संकंटरबी हंगामात ज्वारी, गहू पिकांचा पेरा अतिशय कमी क्षेत्रावर झाला आहे. पुढील काळात चाºयाचा प्रश्न गंभीर होणार आहे. बहुतांश पशुधन ज्वारीच्या कडब्यावर अवलंबून आहे. उत्पादन कमी असल्यामुळे धान्यांचा तुटवडा देखील निर्माण होणार असल्याचे बीड तालुक्यातील खडकी येथील शेतकरी आशिष देशमुख म्हणाले.

पेरणी केलेली ज्वारी, गहू, हरभरा ही पिके उगवली आहेत. मात्र, जमिनीत ओलावा शिल्लक नसल्यामुळे पिके जळू लागली आहेत. तसेच कापसाची फक्त एकच वेचणी झाली आहे. त्यामुळे खरिप व रबी हंगाम हातचा गेला आहे. त्यामुळे शासनाने या दुष्काळी परिस्थितीची दखल घेऊन तात्काळ मदत जाहिर करावी व जनावाºयांच्या चारा व पाण्याचा प्रश्न सोडवावा.- विक्रम टेकडे, शेतकरी, अंदापूरी

चारा छावण्या उभारा

  • गतवर्षी १ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर रबी ज्वारीचा पेरा झाला होता. तर हरभरा १ लाख २४ हजार ५२३ हेक्टर व गहू ४४ हजार ८८५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली.
  • यावर्षी रब्बी ज्वारीची पेरणी ५ हजार ६३९ हेक्टर, तर हरभरा फक्त ६०९ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.
  • त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाने त्वरीत संपूर्ण दुष्काळ जाहीर करुन शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, जनावरांच्या चारा व पाण्यासाठी छावण्या उभारण्याची मागणी शेतकºयांसह, विविध पक्ष व संघटनांकडून होत आहे.
टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरी