शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

उतारवयातही पेन्शनरांचा संघर्ष सुरूच....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:08 AM

देशाच्या विविध क्षेत्रात लोकसेवक म्हणून कर्तव्य बजावल्यानंतर निवृत्त झालेल्या पेन्शनरांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. एरव्ही किरकोळ समस्येवरुन आमदार, खासदार सभागृहात आवाज उठवतात, मात्र ज्या पिढीने शासन व्यवस्थेची घडी सांभाळली त्या पेन्शरांच्या बाबतीत ते काहीच बोलत नाहीत, अशी खंत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देपेन्शनर्स डे : किमान पेन्शनसह पुरेशा आरोग्य सुविधा मोफत मिळण्याची माफक अपेक्षा; जिल्ह्यात ३० हजारांवर पेन्शनर

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : देशाच्या विविध क्षेत्रात लोकसेवक म्हणून कर्तव्य बजावल्यानंतर निवृत्त झालेल्या पेन्शनरांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. एरव्ही किरकोळ समस्येवरुन आमदार, खासदार सभागृहात आवाज उठवतात, मात्र ज्या पिढीने शासन व्यवस्थेची घडी सांभाळली त्या पेन्शरांच्या बाबतीत ते काहीच बोलत नाहीत, अशी खंत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.१७ डिसेंबर रोजी पेन्शनर्स डे साजरा केला जातो. बीड जिल्ह्यात ३० हजारापेक्षा जास्त पेन्शनर आहेत. औपचारिकता म्हणून कार्यक्रमांचे आयोजन व चर्चा होते. मात्र पेन्शनरांचे दु:ख शासन दरबारापर्यंत मांडण्यासाठी खुद्द पेन्शनरांनाच खेटे मारावे लागतात. २००६ ते २००९ या कालावधीतील पेन्शनबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनही अद्याप अंमल झालेला नाही. शासकीय पातळीवर लढा देणाऱ्या पेन्शरांना विविध आरोग्य समस्यांशी संघर्ष करावा लागत आहे. किमान पेन्शन आणि सन्मान द्या एवढीच या पेन्शनरांची मागणी आहे. याकडे शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींसह समाजातील सर्वच घटकांनी लक्ष दिल्यास पेन्शनरांचे जगणे आनंदी होऊ शकेल.१ जून २००६ ते २६ फेब्रुवारी २००९ दरम्यान सेवानिवृत्त झालेल्यांना शेवटच्या मुळ वेतन व ग्रेड पे याच्या निम्मी पेन्शन द्यावी असा निर्णय एक वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायलयाने दिलेला आहे. मात्र अद्यापही शासन स्तरावरुन अध्यादेश निघालेला नाही. पेन्शनरांच्या संघटनेमार्फत विनंती अर्ज करुन पाठपुरावा केल्यानंतर सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी बोळवण केली जाते. सप्टेंबरमध्ये समिती नेमली. तर ३ डिसेंबर रोजी पुन्हा पत्र काढून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात आहे. या निर्णयामुळे शासनावर मोठा भार पडणार नसला तरीही नोकरशाहीच्या तºहेमुळे हा प्रश्न भिजत पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा तातडीने अंमल न झाल्यास अवमान याचिका दाखल करण्याची वेळ पेन्शनरांवर येणार आहे. शासन पातळीवरील ही उदासिनता पेन्शनरांबद्दल सारे काही सांगून जाते.सातव्या वेतन आयोगाची अंमल बजावणी करताना पेन्शनरांवरील पूर्वीचे अन्याय पुन्हा होणार नाहीत यादृष्टीने सुधारणा करुन किमान पेन्शनचा निर्णय सरकारने घ्यावा असे मत पेन्शनर्स संघटनेच्या पदाधिकाºयांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.आरोग्य सुविधा मिळाव्यातउतरत्या वयात विविध आजारही बळावतात. रक्तदाब, मधुमेह व इतर व्याधी तथा आजारांवर उपचार करताना औषधांच्या वाढत्या किंमती डोकेदुखी ठरत आहेत. सरकारी, धर्मार्थ रुग्णालयांमध्ये उपचारासाठी शासकीय योजनांचा आधार असलातरी उपचारादरम्यानचे छुपे चार्जेसमधून लूट केली जाते. ज्येष्ठ नागरिक, पेन्शनरांना मोफत उपचार सुविधा मिळावी म्हणून शासनाचे नियंत्रण गरजेचे असल्याचे पेन्श्नर्स अ‍ॅन्ड सिनिअर सिटीजन्स असोसिएश्नचे जिल्हाध्यक्ष व राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. पी. ए. गोरकर यांनी सांगितले.इपीएस ९५ धारकांचाही लढानिवृत कर्मचाºयांना ९ हजार मुळ रक्कम व महागाई भत्ता, भगतसिंग कोशीयारी कमिटीचा अहवाल लागू करावा, दि. ३१ मे २०१७चे परिपत्रक रद्द करावे, ज्या निवृत्त कर्मचाºयांना पेन्शन नाही अशांना कमीत कमी ५ हजार रुपये पेन्शन लागू करावी, अशा तमाम भारतीय इ.पी.एस. १९९५ पेन्शन धारकांच्या मागण्या आहेत. ‘सबका साथ सबका विकास’ ‘अच्छे दिन आयेंगे’ ते अच्छे दिन मात्र ज्येष्ठ पेन्शनधारकांसाठी आले नाहीत, असे डॉ. संजय तांदळे म्हणाले.

टॅग्स :BeedबीडSocialसामाजिक