शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

आष्टी ते साबलखेड रस्त्याची दयनीय अवस्था; दुरुस्तीसाठी रास्तारोको आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2023 14:03 IST

रस्ता दुरुस्तीचे काम आठ दिवसात सुरू करण्याचे आश्वासन देताच आंदोलन मागे घेण्यात आले

- नितीन कांबळेकडा (बीड) - आष्टी-कडा-साबलखेड या १७ किलोमीटर अंतरावरील रस्त्याची अंत्यत दुरावस्था झाली असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हे अर्धवट काम त्वरित सुरू करावे या प्रमुख मागणीसाठी कडा येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली रस्तारोको आंदोलन करण्यात आले. 

बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी ते साबलखेड हा १७ किलोमीटर अंतरावरील रस्ता अत्यंत खराब झाला होता. अनेक वेळा उपोषण, रस्तारोको, गांधीगीरी केल्यानंतर १२१ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. कामाचे टेंडर निघाले, झाडाची मोजणी, साईट पट्टे सापसफाई ही कामे हाती घेतले. पण त्यानंतर कामाला गती नाही. यामुळे रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. याचे काम तातडीने काम सुरू करावे या मागणीसाठी नागरिकांनी रस्तारोको आंदोलन केले.  दरम्यान, आठ दिवसात कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार विनोद गुंडांनवार यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या रस्तारोको आंदोलनात माजी आमदार साहेबराव दरेकर, सरपंच युवराज पाटील, संदिप खाकाळ, दिपक सोनवणे, उपसरपंच बाळासाहेब कर्डिले, माजी सभापती  संजय ढोबळे, यशवंत खंडागळे, अशोक ढवण, पोपट गर्जे, जय शिंदे, संतोष मेहेत्रे, सुनील अष्टेकर, सुभाष ढोबळे, संजय थोरवे, दीपक कर्डिले, बिपीन भंडारी, रमेश शिरोळे, दिपक गरूड यांच्यासह कडा परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. कडा पोलिस चौकीचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पोलिस उपनिरीक्षक राजेद्र पवार, प्रमोद काळे, पोलिस हवालदार बाबासाहेब राख, मंगेश मिसाळ, रियाज पठाण, राजकिरण निमसे, यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :Beedबीड