शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

यूपीएससी उत्तीर्ण व्हा, ११ लाखांचे बक्षीस मिळवा! माजी आमदारांची विद्यार्थ्यांना भन्नाट ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 19:46 IST

आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी विद्यार्थ्यांना केले आवाहन

- नितीन कांबळेकडा (बीड) : आपला परिसर हा दुष्काळी आहे. शाळेत शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी हे शेतकरी, गोरगरीब कुटुंबातील आहेत, आई-वडिलांचे नावलौकिक करण्यासाठी शेतकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी करावी. यूपीएससी पास होऊन यावे अन् संस्थेच्यावतीने ११ लाख रुपयांचे बक्षीस घेऊन जावे, असे आवाहन माजी आमदार भिमराव धोंडे यांनी कडा येथे संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना केले.

कडा येथील श्रीराम कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रयोगशाळा सहाय्यक पांडुरंग धोंडे यांचा सेवापुर्ती सोहळ्याच्या प्रसंगी अध्यक्षपदावरून मा. आ. भीमराव धोंडे  बोलत होते. यावेळी व्यासपीठावर युवा नेते अजय धोंडे, जेष्ठ नेते विठ्ठलराव बनसोडे, चेअरमन राजेश धोंडे, प्राचार्य डॉ. हरिदास विधाते, दिलीप काळे, प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबासाहेब गिर्हे, प्रा. बाळासाहेब धोंडे, प्रा. संजय धोंडे व इतर उपस्थित होते. 

पुढे बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, आपल्या शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत कमी पडतात. मी यापूर्वीही जाहीर केले होते की, यूपीएससी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, परंतु ते कोणीही जिंकले नाही. आता परत आवाहन करतो की,  संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून यूपीएससी पास व्हावे अन्  ११ लाख रुपयांचे बक्षीस घेऊन जावे. भविष्यात काय व्हायचे ते आत्ताच ठरवा, असेही माजी आमदार धोंडे म्हणाले.

याप्रसंगी मुख्याध्यापक सिद्धेश्वर शेंडगे, प्रा. राम बोडखे, प्रा . श्रीकांत धोंडे, प्रा. कांचन गोरे, निलेश गोरे, प्रा. मंगल झगडे यांची भाषणे झाली.प्रास्ताविक प्राचार्य महादेव दानवे यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. दत्तात्रय ढवळे यांनी केले,उपस्थितांचे आभार प्रा. संजय धोंडे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षकांसह पांडुरंग धोंडे यांचे नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होते.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगBeedबीडStudentविद्यार्थी