शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंनी परळीचा गड राखला; पद्मश्री धर्माधिकारी नगराध्यक्षपदी, दीपक देशमुखांसह पत्नीचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 18:03 IST

Parli Nagar Parishd Election 2025: निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले दीपक देशमुख नगरसेवक, तर पत्नी संध्या देशमुख नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभूत!

Parli Nagar Parishd Election 2025: आज (दि.21) राज्यभरातील 287 नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल लागले. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ठिकाणी सत्ता काबीज केली, तर दुसऱ्या अन् तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे शिवसेना(शिंदे) आणि राष्ट्रवादी(अप) पक्षाने विजय मिळवला. या निवडणुकीत अनेक मात्तबर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यासाठीही ही निवडणूक अंत्यत महत्वाची होती. अखेर त्यांना आपला परळीचा गड राखण्यात यश आले.

वाल्मिक कराड प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्यावर सतत टीका सुरू होती. तसेच, निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी परळीत तब्बल आठ दिवस तळ ठोकत प्रचार सभा, फेऱ्या काढून वातावरण ढवळून काढले होते. यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष परळीच्या निकालाकडे लागून होते. अशा परिस्थितीत, धनंजय मुंडे यांनी परळीत विविध ठिकाणी प्रचारसभा आणि कॉर्नर बैठका घेत महायुतीचा जोरदार प्रचार केला होता. यामुळेच परळी नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे.

महायुतीने नगरसेवक पदाच्या दोन जागा मतदानापूर्वीच बिनविरोध जिंकत विजयाची सलामी दिली होती. उर्वरित 33 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने एकसंघपणे लढत देत सत्ता मिळवली. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या उमेदवार संध्या दीपक देशमुख यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. काँग्रेसच्या सय्यद मैमुना हनीफ या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

नगराध्यक्षपदाचा निकाल

पद्मश्री धर्माधिकारी (घड्याळ) - 28,091 मते

संध्या देशमुख (तुतारी) - 12,429 मते

सय्यद मैमुना हनीफ (पंजा) - 8,552 मते

नगरसेवक पदावर महायुतीची मजबूत पकड

नगरपरिषदेच्या नगरसेवक पदाच्या निवडणुकांमध्येही महायुतीने स्पष्ट वर्चस्व राखले आहे. एकूण 35 जागांपैकी विविध पक्ष व गटांचे प्रतिनिधी निवडून आले असून, त्यामध्ये महायुतीतील उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे.

पक्षनिहाय विजयी उमेदवारांची संख्या

राष्ट्रवादी - अजित पवार गट : 16

भाजप : 7

शिवसेना- शिंदे गट : 2

एमआयएम : 1

काँग्रेस : 1

राष्ट्रवादी-  शरद पवार गट : 2

अपक्ष : 6

प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची यादी

प्रभाग क्र.उमेदवाराचे नावनिकाल / चिन्हइतर पक्षाचा विजयी उमेदवार/चिन्ह
नगराध्यक्षपद्मश्री बाजीराव धर्माधिकारीघड्याळ विजयी
1 अआघाव वंदना अश्विनकुमारकमळ विजयी
1 बमुंडे दीपक प्रल्हादरावघड्याळ विजयी
2 अइंगळे कविता अनंतघड्याळ विजयी
2 बअल्ताफ खान पठाणघड्याळ विजयी
3 अशेख अजिम मुजिब-फारुख गणी सय्यद – पंजा विजयी
3 बपठाण जकीयाबी अयुबशेख आयेशा मोसीन – पंजा विजयी
4 अनितीन नामदेव रोडेघड्याळ विजयी
4 बनाईकवाडी शांता मुंजामीरा केशव नागरगोजे – ऑटो विजयी
5 अजयश्री शंकरअप्पा मोगरकरकमळ विजयी
5 बवैजनाथ भानुदास सोळंकेघड्याळ विजयी
6 अबनसोडे (माळी) अंजली केशवकमळ विजयी
6 बव्यंकटेश बाबुराव शिंदेधनुष्यबाण विजयी
7 अकेंद्रे उषा किशोरअश्विनी राहुल केंद्रे– कपबशी विजयी
7 बसचिन रामनाथ सारडाकमळ विजयी
8 अव्हावळे महानंदा रानबाअर्चना महेंद्र रोडे – कपबशी विजयी
8 बशकील कुरेशीइस्माईल मौलाना शेख – ट्रक विजयी
9 अकार्तीक भाऊसाहेब कांबळेघड्याळ विजयी
9 बखैसर राजाखान पठाणघड्याळ विजयी
10 अडावरे सरोजा गौतमघड्याळ विजयी
10 बमहेश गोविंदराव मुंडेलक्ष्मण मुरकुठे– सफरचंद विजयी
10 ककुसुम आप्पासाहेब चाटेकमळ विजयी
11 अरोडे महादेव नागनाथघड्याळ विजयी
11 बगित्ते जयश्री रवींद्रधनुष्यबाण (निर्दलीय)
12 अकराड प्राजक्ता भाऊड्याघड्याळ विजयी
12 बमेनकुदळे योगेश विजयकुमारकमळ विजयी
13 अबळवंत रेश्मा केशवघड्याळ (निर्दलीय)
13 बलाहोटी शिल्पा जयपालघड्याळ विजयी
14 अमुंडे पनुकुमार महादेवकमळ विजयी
14 बडॉ. पुजा प्रीतेश तोतलाकमळ विजयी
15 अप्रतिक्षा जयराज देशमुखघड्याळ विजयी
15 बआफरीन बेगम अन्वर मिस्कीनसय्यद फरजाना बेगम सादेक – ट्रक विजयी
16 असारीका सुशील हरंगुळेकुशीर आरेफाबेगम महेबुबपाशा– तुतारी विजयी
16 बतखीखानबागवाले नितीन माणिक – तुतारी विजयी
17 अरुपाली रमेश पवारघड्याळ विजयी
17 बशेख हाजीबाबूघड्याळ विजयी
English
हिंदी सारांश
Web Title : Dhananjay Munde retains Parli; Dharmadhikari wins, Deshmukh loses election.

Web Summary : Dhananjay Munde secured Parli, while Padmashri Dharmadhikari became Mayor. Deepak Deshmukh and his wife faced defeat. The Mahayuti achieved a significant victory in the Parli Nagar Parishad elections, dominating councillor positions.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Dhananjay Mundeधनंजय मुंडेparli-acपरळीMunicipal Corporationनगर पालिका