परळी : येथील औष्णिक वीज केंद्रातील तंत्रज्ञाच्या घराचे कुलूप तोडून चोरांनी घरात प्रवेश करत कपाट फोडले. त्यानंतर कपाटातील ४ लाख ९१ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवल्याची घटना परळी शहरातील जुन्या थर्मल कॉलनीत घडली. याप्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील औष्णिक वीज केंद्रातील तंत्रज्ञ अशोक गुंडू पाटील हे जुन्या थर्मल कॉलनीतील एफ-६, क्वार्टरमध्ये राहतात. त्यांचे वडील गुंडूआप्पा हे आठ दिवसांपूर्वी लोहारा, जि. नांदेड येथे गावी गेले होते. त्यामुळे घर बंद असल्याची संधी शोधत चोरांनी क्वार्टरचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाट फोडले. कपाटातील सोन्याच्या अंगठ्या, मणी, मिनी गंठण, मणी मंगळसूत्र, चांदीची अन्नपूर्णा, मूर्ती आणि चैन, इष्टलिंग असा एकूण ४ लाख ४१ हजार रुपये किमतीचा सोन्याचा व ५० हजार रुपये किमतीचा चांदीचा ऐवज लांबवला.
चोरीची घटना १४ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अशोक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संभाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरांवर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील संभाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Web Summary : Thieves broke into a Parli thermal colony house, stealing gold and silver jewelry worth ₹4.91 lakhs. The incident occurred while the resident was away. Police have registered a case and are investigating the burglary.
Web Summary : परली थर्मल कॉलोनी में चोरों ने एक घर में घुसकर 4.91 लाख रुपये के सोने-चांदी के गहने चुरा लिए। घटना उस समय हुई जब निवासी बाहर था। पुलिस ने मामला दर्ज कर चोरी की जांच शुरू कर दी है।