शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

पारगाव सिरसमध्ये बनावट देशी दारू बनविणाऱ्या अड्डयावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:32 IST

बनावट देशी दारू तयार करणाऱ्या अड्डयावर छापा टाकून पाच आरोपींस पाच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बीड तालुक्यातील पारगाव सिरस येथे बुधवारी सकाळी पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली.

ठळक मुद्देबीड विशेष पथकाची कारवाई : पाच आरोपींसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड : बनावट देशी दारू तयार करणाऱ्या अड्डयावर छापा टाकून पाच आरोपींस पाच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बीड तालुक्यातील पारगाव सिरस येथे बुधवारी सकाळी पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली.लतीब सय्यद हकीम (३४ रा.पारगाव सिरस), सुशील बबन शिंदे (२७ रा.पालवण), गणेश राधाकिशन उगले (३६), सुमंत वशिष्ट नवले (३८), अशोक उर्फ सोनू शेषेराव पवार (२०) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. गत काही दिवसांपासून पारगाव शिवारात बनावट दारू बनविली जात असल्याची माहिती पोउपनि रामकृष्ण सागडे यांना मिळाली होती. त्यांनी खात्री करून बुधवारी पहाटे सापळा लावला. सकाळी ९ वाजता दारू बनविण्यास सुरूवात करताच पथकाने छापा टाकून पर्दाफाश केला. यात तयार केलेल्या बनावट दारूचे ५० बॉक्स, सीलींग मशीन, मिक्स करणारा पाण्याच पंप, रिकाम्या बाटल्या, रिकामे झाकण, कागदी पुष्टे, स्टीकर, बॉक्स पॅक करण्याचे चिकट टेप, चारचाकी गाडी (एमएच १२ ईजी ९०२८) असा एकूण ४ लाख ८३ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच २०० लिटर रसायनही नष्ट केले. सागडे यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोनि घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोउपनि रामकृष्ण सागडे, पांडूरंग देवकते, गणेश नवले, रेवननाथ दुधाने, जयराम उबे, सायबर सेलचे विकी सुरवसे आदींनी केली.दोन वर्षांपासून व्यवसायसूत्रांच्या माहितीनूसार लतीब व सुशील हे याचे मास्टरमार्इंड आहेत. इतर तिघे कामगार आहेत. मागील दोन वर्षांपासून ते हा बनावट दारूचा व्यवसाय करतात. आतापर्यंत ते परजिल्ह्यात दारू बनवित होते. १० दिवसांपूर्वीच ते पारगावला आले आणि बुधवारी सकाळी पोलिसांनी छापा टाकून याचा पर्दाफाश केला. दरम्यान, बनावट दारू बनविणाऱ्यांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी