शहरं
Join us  
Trending Stories
1
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
3
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
4
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
5
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
6
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
7
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
8
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
9
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
10
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
11
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
12
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
13
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
14
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
15
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
16
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
17
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
18
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
19
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...

पंकजा मुंडेंचा नव्या संघर्षाचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 23:56 IST

‘शांत बैठी हूं तो ये मत समझना की आग नहीं है मेरे अंदर, डरती हूं कहीं समंदर कम ना पड जाए बुझाने के लिए’ अशा सूचक शब्दात माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून अनेकांना इशारा देताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

ठळक मुद्देलोकनेते गोपीनाथराव मुंडे जयंती : समाधीस्थळी हजारो कार्यकर्ते नतमस्तक, सातारा जिल्ह्यातून आली मुंडेप्रेमींची मशाल ज्योत

परळी : ‘शांत बैठी हूं तो ये मत समझना की आग नहीं है मेरे अंदर, डरती हूं कहीं समंदर कम ना पड जाए बुझाने के लिए’ अशा सूचक शब्दात माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून अनेकांना इशारा देताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच सार्वजनिक व्यासपीठावरून संवाद साधत आपल्या तीव्र भावना व्यक्त करीत गोपीनाथ मुंडे सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील सर्व जातीधर्माची व्रजमूठ करुन हातात मशाल घेत सर्वसामान्य माणसांसाठी लढा देण्याची घोषणा करीत नव्या संघर्षाचा एल्गार केला.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर १२ डिसेंबर रोजी समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी सकाळ पासूनच कार्यकर्ते व भक्तांची रीघ लागली होती. हजारो कार्यकर्त्यांनी तसेच राज्यातून आलेल्या नेते व पदाधिकाऱ्यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.मुख्य कार्यक्रमाच्या व्यासपीठाकडे पंकजा मुंडे यांच्या सोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, बबनराव लोणीकर, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, खा.डॉ. प्रीतम मुंडे, पाशा पटेल, सुजीतसिंह ठाकूर, आ. अतुल सावे, आ. मोनिका राजळे, आ. नारायण कुचे, आ.सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, आ. मेघना बोर्डीकर, आ. नमिता मुंदडा, आ.राजेश पवार, आ. श्वेता महाले, आ. माधुरी मिसाळ, आ. आकाश फुंडकर, आ. तुषार राठोड आदींसह राज्यातील विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते येत होते.दरम्यान, बुधवारी रात्री ९ वाजता सातारा जिल्ह्यातून मुंडे प्रेमी मशाल घेऊन गोपीनाथगडावर दाखल झाले होते. त्यावेळी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी स्वागत केले.लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त उप जिल्हा रुग्णालय, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संयुक्त विद्यमाने परळी येथे दोन दिवस महाआरोग्य शिबीर घेण्यात आले. शिबिरात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी विचारपूस केली. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना चष्म्यांचे वाटप झाले. जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबीर, विविध समाजोपयोगी कार्यक्रम तसेच अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :BeedबीडGopinath Mundeगोपीनाथ मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेPritam Mundeप्रीतम मुंडे