शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडे यांनी केली परळी-बीड रेल्वेमार्गाच्या कामाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 20:50 IST

हा मार्ग पुढील वर्षाखेरीस पुर्ण करण्याचे उद्दिष्ट असून  काम वेळेत व जलदगतीने पुर्ण करावे अशा सूचना त्यांनी केल्या.

ठळक मुद्देजलदगतीने काम पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

बीड :  राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज परळी - बीड - नगर रेल्वे मार्गाच्या परळीपासून सुरू झालेल्या  कामाची आज पाहणी केली. पाहणीनंतर रेल्वे आणि महसूल अधिका-यांच्या बैठकीत या संपूर्ण कामाचा आढावा घेवून  सदर काम जलदगतीने व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 

जिल्हा वासियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाचे काम सध्या गतीने सुरू आहे. २६१ किमी. लांबीच्या या मार्गावर केंद्र व राज्य सरकारचे मिळून २८५६ कोटी रूपये खर्च होणार आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंकजा मुंडे व खा डाॅ प्रितम मुंडे हया सध्या केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कसोशीने प्रयत्न करत असून २०१९ अखेरपर्यंत बीड पर्यंत रेल्वे धावण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश येणार आहे. 

परळीत केली कामाची पाहणी नगर-बीड प्रमाणेच रेल्वेमार्गाचे काम  परळी पासूनही सुरू करावे अशी सूचना पंकजा मुंडे यांनी केली होती, त्यानुसार कांही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री  सुरेश प्रभू यांच्या हस्ते परळीत या कामाला सुरूवात झाली होती. आज पंकजा मुंडे यांनी एन.एच. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाठिमागील बाजूस सुरू असलेल्या कामाची पाहणी केली व समाधान व्यक्त केले.  त्यानंतर त्यांनी चेमरी विश्रामगृहात रेल्वे व महसूल विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली.  परळी ते बीड या ९० किमी लांबीच्या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले असून माती भराव, सपाटीकरण, लहान मोठ्या पुलाचे काम वेगाने सुरू आहे. हा मार्ग पुढील वर्षाखेरीस पुर्ण करण्याचे उद्दिष्ट असून  काम वेळेत व जलदगतीने पुर्ण करावे अशा सूचना त्यांनी केल्या. 

या बैठकीस उप जिल्हाधिकारी गणेश महाडिक परळी, गणेश नि-हाळी पाटोदा, प्रियंका पवार माजलगांव, जिल्हा कृषी अधीक्षक चपळे, रेल्वे बोर्डाचे कार्यकारी अभियंता योगेश गरड, वरिष्ठ अभियंता सत्येंद्र कुंवर, तहसीलदार शरद झाडके आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वेPankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीड