शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
3
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
4
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
5
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
6
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
7
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
8
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
9
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
11
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
12
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
13
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
14
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
15
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
16
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
17
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
18
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
19
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
20
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीतील ऑक्सिजन प्लांट जनतेसाठी वरदान ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:37 IST

आष्टी : कोरोनासारख्या परिस्थितीत आष्टी ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात येत असलेला ऑक्सिजन प्लांट तालुक्यातील जनतेसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार ...

आष्टी :

कोरोनासारख्या परिस्थितीत आष्टी ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात येत असलेला ऑक्सिजन प्लांट तालुक्यातील जनतेसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब आजबे यांनी व्यक्त केले.

आष्टी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात आमदार आजबे बोलत होते. कोरोना विषाणूचा तालुक्यात प्रकोप सुरू आहे. या परिस्थितीत कोरोनाग्रस्त नागरिकांना ऑक्सिजन पुरवठा तत्काळ होण्यासाठी पहिला ऑक्सिजन प्लांट उभा राहत आहे. यासाठी २ कोटी ४ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. मुंबईच्या ईकेव्ही एंटरप्रायजेस कंपनीला काम देण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ आ. बाळासाहेब आजबे, माजी आमदार भीमसेन धोंडे यांच्या हस्ते झाला.

यावेळी तहसीलदार राजाभाऊ कदम, माजी जि.प. अध्यक्ष शिवाजी राऊत, तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, सुनील नाथ, संदीप अस्वर, परमेश्वर शेळके, भाऊ घुले, रामकृष्ण बांगर, सोनाली येवले, अधीक्षक डाॅ. राहुल टेकाडे उपस्थित होते.

यावेळी भीमसेन धोंडे म्हणाले, ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन झाले आहे. लवकरात लवकर काम होऊन ऑक्सिजननिर्मिती सुरू होईल. यामुळे तालुक्यातील रुग्णांनी आता ऑक्सिजनअभावी रेफर करण्याची गरज नाही. तिसरी लाट ही लहान मुलांना धोकादायक असल्याने पालकांनी सर्दी, खोकला मुलांना जाणवल्यास तत्काळ उपचार घ्यावेत.

आष्टी शहरातील आयटीआय काॅलेजमध्ये फक्त लहान मुलांच्या उपचारांसाठी ५० बेडची सोय करण्यात येणार आहे, असेही आमदार आजबे यांनी सांगितले.